Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: 'या' कलाकाराच्या लग्नाला हुबेहुब कॉपी करणार Katrina-Vicky

कतरिना - विकीचा आज मेहंदी आणि संगीत सोहळा 

Updated: Dec 8, 2021, 09:08 AM IST
Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: 'या' कलाकाराच्या लग्नाला हुबेहुब कॉपी करणार Katrina-Vicky

मुंबई : Katrina - Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाची चर्चा आहे. बॉलिवूडमधील प्रत्येक लग्न हे खास असतं. विकी-कतरिना डेस्टिनेशन वेडिंग करत आहेत. असं लग्न इंडस्ट्रीत पहिल्यांदा होत नाही. 

कतरिना आणि विकीने त्यांच्या लग्नाची गुप्तता पाळली आहे. या दोघांचं लग्न बॉलिवूडमधील एका लग्नाच्या प्रेरणेतून होत आहे. अशी चर्चा रंगली आहे. या दोघांनी अशा लग्नाची कल्पना आपली सह कलाकार अभिनेत्रीकडून घेतली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशलचं लग्न अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या लग्नाच्या प्रेरणेतून डिझाइन करण्यात आलं आहे. 

विकी कौशल आणि कतरिना कैफ ९ डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील फोर्ट बरवारा येथे सात फेरे घेतील. विकी कौशल आणि कतरिना कैफचे लग्न दोन रितीरिवाजांनुसार होऊ शकते. विक-कॅट ख्रिश्चन विवाह आणि हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करू शकतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. कतरिना आणि विकीचे कुटुंब संगीत आणि मेहंदीचा आनंद घेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, विकी-कतरिना त्यांच्या लग्नात संगीत फंक्शनमधून परफॉर्म करणार आहेत. संगीतात कॅट आणि विकी काला चष्मावर नाचणार आहेत. त्याचवेळी विकी कतरिना लग्नात 'तेरी ओ' या रोमँटिक गाण्यावर एक कपल डान्स करणार आहे.

 

कतरिना विकीचे लग्न खूपच स्वप्नवत असणार आहे. कॅट आणि विकीच्या लग्नाच्या सर्व फंक्शन्समध्ये एक खास थीम ठेवण्यात आली आहे. कतरिना आणि विकी त्यांच्या लग्नाबद्दल खूप आनंदी आहेत. हे सोमवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर पापाराझींनी पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. कॅटने मुंबईहून जयपूरला जाण्यासाठी शरारा सेट आउटफिट केला होता. तर दुसरीकडे विकी कौशल खाकी कलरच्या पँटसोबत प्रिंटेड शर्टमध्ये दिसला.