KBC 13: बिग बींच्या मनाचा मोठेपणा! स्पर्धकासाठी चक्क बनले 'Food delivery boy'

KBC 13:बॉलिवूडचे दिग्गज नेते अमिताभ बच्चन यांचा दिलदारपणा....स्पर्धकासाठी बनले Food delivery boy

Updated: Sep 15, 2021, 11:11 PM IST
KBC 13: बिग बींच्या मनाचा मोठेपणा! स्पर्धकासाठी चक्क बनले 'Food delivery boy' title=

मुंबई: टीव्हीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपती सध्या खूप चर्चेत आहे. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा कार्यक्रम आवडतो. कोणी अमिताभ यांच्यासाठी तर कोणी हा केवळ शो पाहण्यासाठी म्हणून बरोबर टीव्हीसमोर बसतात. KBC च्या 13 व्या सीझनमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांच्या मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा सर्वांनाच पाहायला मिळाला. 

मुंबईच्या एका स्पर्धकासाठी चक्क अमिताभ बच्चन 'Food delivery boy' बनले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. मुंबचा आकाश वाघमारे हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो जेव्हा केबीसी 13 सीझनच्या हॉट सीटपर्यंत पोहोचला आहे. आपलं कुटुंब आणि शिक्षण चालवण्यासाठी काम सांभाळून अभ्यास करणाऱ्या या आकाशची संघर्षमय कहाणी त्याने सांगितली. 

घरोघरी फूड डिलिव्हरी करणाऱ्या या आकाशसाठी चक्क बिग बी अमिताभ बच्चन सेटवर 'Food delivery boy' बनले. सोनी टीव्हीने याचा व्हिडीओ आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. आकाशला अमिताभ बच्चन यावेळी खाण्याचं पार्सल पाकित हातात देतानाचा हा व्हिडीओ आहे. 

अमिताभ बच्चन यांनी दिलेलं हे खाद्यपदार्थांचं पार्सल पाहून यावेळी आकाश खूप भावुक झाला होता. केबीसीच्या 13 व्या सीझनमध्ये आकाशने 12 प्रश्नांची उत्तरं देऊन 25 लाख रुपये जिंकले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या मनाचा मोठेपणा या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी खूप लाईक आणि कमेंट केल्या आहेत. केबीसी शो अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यांचं सूत्रसंचालन सर्वांनाच खूप आवडतं. बिग बी अमिताभ यांचा प्रत्येक नव्या एपिसोडला एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना या शोच्या निमित्तानं पाहायला मिळतो.