KBC 13: दीपिका- फराहसमोर ठेवला 25 लाखांचा प्रश्न; पाहा त्यांना उत्तर देता आलं की नाही

हा प्रश्न चकवा देतो की त्या या प्रश्नाचं उत्तर देत ही रक्कम जिंकतात ?

Updated: Sep 7, 2021, 09:19 PM IST
KBC 13: दीपिका- फराहसमोर ठेवला 25 लाखांचा प्रश्न; पाहा त्यांना उत्तर देता आलं की नाही
kbc 13

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सूत्रसंचालनानं परिपूर्ण अशा 'कौन बनेगा करोड़पती' (Kaun Banega Crorepati)  या कार्यक्रमाचं 13 वं पर्व सध्या चांगलंच गाजतंय. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यात दरवर्षीप्रमाणं यंदाही भर पडली आहे. 

स्पर्धकांसोबतच विविध सेलिब्रिटीही या कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसतात. ज्यामुळं लोकप्रियतेच्या बाबतीत हा कार्यक्रम भल्याभल्या मालिकांनाही मागे टाकतो. सध्या केबीसीच्या चर्चा सुरु असण्यास कारणीभूत ठरत आहे त्यामध्ये असणारी दीपिका आणि फराह यांची उपस्थिती. 

Shocking : पती रणवीर सिंगविरोधात दीपिकाची तक्रार; वचन तोडलं आणि....

 

अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan) यांनी नुकतीच केबीसीच्या मंचावर हजेरी लावत काही प्रश्नांची उत्तरं दिली. उत्तरं देता देता या जोडीनं 12 लाख 50 हजारांचं बक्षीस जिंकलं. ज्यानंतर आता ही जोडी 25 लाख रुपयांच्या प्रश्नावर पोहोचल्याचं कार्यक्रमाच्या एका प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. दीपिका आणि फराहला हा तब्बल 25 लाखांचा प्रश्न चकवा देतो की त्या या प्रश्नाचं उत्तर देत ही रक्कम जिंकतात हे येत्या भागामध्येच स्पष्ट होणार आहे. 

दरम्यान, केबीसीच्या या प्रोमोमध्ये दीपिका आणि फराहची उपस्थिती असल्यामुळं अमिताभ बच्चनसुद्धा सूत्रसंचालन करताकरता या क्षणांचा आनंद घेताना दिसत आहेत. कुठं ते चित्रपटांच्या गप्पा मारताना दिसत आहेत. तर कुठे दीपिका आणि रणवीरच्या खासगी आयुष्याबाबत बोलताना दिसत आहेत.