Kaun Banega Crorepati 15 : बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात बीग बी अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती (KBC) हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय झालाय. या कार्यक्रमांचा पंधरावा हंगाम सुरु असून काही स्पर्धकांमुळे हा हंगामही चर्चेत आहे. या कार्यक्रमात ज्युनिअर्स वीक (Kaun Banega Crorepati 15 Junior) आयोजित करण्यात आला होता. यात एका 14 वर्षांच्या मुलाने एक करोड रुपयांपर्यंत मजल मारली
14 वर्षांच्या मयंकने पटकावले 1 कोटी
हरियाणातल्या महेंद्रगढ इथं राहणारा 14 वर्षांचा मयंक (Mayank) या आठवड्यात हॉट सीटवर होता. अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची धडाधड उत्तर देत मंयकने 1 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. एक कोटी जिंकणारा सर्वात लहान स्पर्धक बनत मयंक इतिहास रचला आहे. मयंकला सात कोटीसाठीच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यामुळे एक कोटी रुपयांवर त्याने समाधान मानलं.
काय होता एक कोटी रुपयांसाठीचा प्रश्न?
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासमोर हॉट सीटवर बसलेला आठवी इयत्तेत शिकणारा मयंक पूर्ण कार्यक्रमात जराही घाबरला नव्हता. मयंकने आपल्या बुद्धी आणि तत्परतेने महानायक अमिताभ बच्चन यांना चांगलंच इम्प्रेस केलं. अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या अनेक कठिण प्रश्नांची उत्तरं देत मयंकने एकएक टप्पा पार केला. शेवटी एक कोटीच्या प्रश्न विचारल्यावर सर्वांचा श्वास रोखला गेला. एक कोटी रुपयांसाठी प्रश्न होता
प्रश्न:- किस यूरोपीय मानचित्रकार को वो मानचित्र बनाने का श्रेय दिया जाता है, जिसमें नए खोजे गए मालद्वीप को 'अमेरिका' नाम दिया गया था?
यासाठी पर्याय होते
अब्राहम आर्टेलियस
जेरार्डस मर्केटर
जियोवन्नी बटिस्टा एग्रीसी
मार्टिन वाल्डसीमुल्लर
मयंकने घेतला लाईफलाईनचा आधार
हा प्रश्न थोडा अवघड असल्याने मयंक काहीसा गोंधळला. काही वेळ विचार केल्यानंतर त्याने शेवटची लाईपलाईन वापरण्याचा निर्णय घेतला. लाईफ लाईनच्या पर्यायानुसार D म्हणजे मार्टिन वाल्डसीमुल्लर (Martin Waldseemulier) हे उत्तर आलं. मयंकने D हा पर्याय लॉक करण्यास सांगितला आणि हे उत्तर अचूक ठरलं. या उत्तराबरोबरच मयंक एक कोटीचा मानकरी ठरला. 14 वर्षांचा मयंक कोट्यधीश झाल्याने अमिताभ बच्चन यांनी त्याचं कौतुक केलं आणि त्याला मिठी मारली.