close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सैफच्या लेकिकडून २२ वर्षांपूर्वीच्या चोरीची कबुली

पाहा तेव्हा तिने नेमकं काय चोरलेलं.... 

Updated: Oct 17, 2019, 05:36 PM IST
सैफच्या लेकिकडून २२ वर्षांपूर्वीच्या चोरीची कबुली

मुंबई : सोशल मीडिया आणि चित्रपट वर्तुळात फार कमी वेळातच आपलं वेगळं स्थान प्रस्थापित करणाऱ्या अभिनेत्री सारा अली खान हिने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आगामी चित्रपट किंवा नव्या लूकमुळे नव्हे, तर एका गौप्यस्फोटामुळे. अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट साराने सोशल मीडियाच्याच माध्यमातून सर्वांसमोर व्यक्त केली आहे. 

आगामी चित्रपट, चित्रपटांचे सेट, डिझायनर लूक असं सारंकाही सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या साराने, आपण जवळपास २२ वर्षांपूर्वी चोरी केल्याचं उघड केलं आहे. बसला ना धक्का? सारा आणि चोरी...... 

साराने चोरी केली होती, पण ही चोरी कसली हे एकदा तिच्या पोस्टमधून पाहाच. 

बालपणीची खास आणि पहिलीवहिली मैत्रीण वेदिका पिंटो हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साराने तिला शुभेच्छा देत बालपणापासून आतापर्यंतचे काही खास फोटो शेअर केले. या फोटोंसोबतच तिने साजेसं कॅप्शनही लिहिलं आहे. ज्यामध्येच तिने या अनेक वर्षांपूर्वीच्या चोरीचा उल्लेख केला आहे. 

''वेदिका... बालपणीपासूनची माहिझी पहिली मैत्रीण... तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला तर आनंदच होतोय की मी तुझी 'पेपी' चोरली होती. २२ वर्षांपासूनची चोरी... मी अजूनही तुझ्यावर हसते. चेहऱ्यावर लावलेला केक तुला शोभतोय बरं....'', असं लिहित साराने बालपणीच्या सुरेख क्षणांना अवघ्या काही शब्दांतच मांडलं. 

साराने दिलेली ही कबुली पाहून अनेकांना त्यांच्या बालपणीच्या अशा काही खोड्या आठवल्या असतीलच. बी- टाऊनची ही प्रसिद्ध अभिनेत्री मित्रपरिवार, कुटुंब आणि करिअर यामध्ये सुरेख ताळमेळ साधत पुढे जात आहे. त्यामुळे साराला ही चोरीची चूकही माफ... असंच म्हणावं लागेल.