सैनिकांच्या‌ शब्दाचा मान राखणारा 'सेटेलाइट शंकर'

अभिनेता सुरज पंचोली चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.

Updated: Oct 17, 2019, 05:44 PM IST
सैनिकांच्या‌ शब्दाचा मान राखणारा 'सेटेलाइट शंकर'

मुंबई : 'जिस देश को बाटने वाली हजार चिजे है, उसे एक सिपाही ने जोड दिया...' जम्मू काश्मीरच्या खोऱ्यांपासून ते नियंत्रण सीमेपर्यंत तनाव आहे. हा तनाव फक्त त्याच ठिकाणी नाही तर देशात देखील आहे. हे वास्तवदर्शी चित्र 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटाच्या माध्यमातून रेखटण्याचा प्रयत्न दिग्दर्शक इरफान कमल यांनी केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

अभिनेता सुरज पंचोली चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटाचा ट्रेलर फारच दमदार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या  पसंतीस पडत आहे. 

इरफान खान दिग्दर्शित 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटाची निर्मिती मुराद खेतानी आणि अश्विन वर्दे यांची आहे. अभिनेता सुरज पंचोली आणि अभिनेत्री मेघा आकाश मुख्य भूमिकेत झळकणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी 'सेटेलाइट शंकर' चित्रपटगृहात दाखल होणार आहे.