कियारा आडवाणीचं नाव 'या' अभिनेत्यासोबत जोडलं जातंय

जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता? 

Updated: Feb 8, 2021, 02:16 PM IST
कियारा आडवाणीचं नाव 'या' अभिनेत्यासोबत जोडलं जातंय

मुंबई : बॉलिवूडमधील वाद, तंटा आणि प्रेम प्रकरणाची चर्चा सर्वत्र रंगलेली असते. कलाविश्वात कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जात, हे काही सांगता येत नाही. पण कालांतराने त्यांच्या नात्याच्या चर्चा सर्वदूर पसरू लागतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कियारा आडवाणीचं नाव बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत जोडलं जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे मालदीवमधील एकत्र फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. 

आता कियारा आणि सिद्धार्थला दिग्दर्शक करण जोहरच्या एका पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आले. करणने त्याची मुलं यश आणि रूहीच्या वाढदिवसानिमित्त एक पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये अनेक कलाकारांसह कियारा आणि सिद्धार्थदेखील उपस्थित होते. 

Kiara Siddharth

त्या दोघांनी पार्टीत एकत्र एन्ट्री केल्यामुळए पुन्हा त्यांच्या चर्चा जोरदार रंगू लागल्या आहेत. कियारा आणि सिद्धार्थ सतत एकत्र स्पॉट होत असल्यामुळे त्यांच्यात प्रेमाचं गुलाब फुलत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. 

गेल्या महिन्यात दोघे लंचसाठी बाहेर गेले होते, तेव्हाचे दोघांचे फोटो देखील व्हायरल झाले होते. यावेळी सिद्धार्थचे आई-वडील देखील त्यांच्यासोबत होते. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा करण जोहरच्या पार्टीत  एकत्र दिसले होते. 

एवढचं नाही तर दोघे एकत्र रूपेरी पडद्यावर देखील दिसणार आहेत. 'शेरशाह' (Shershaah) चित्रपटाच्या माध्यमातून दोघे एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत हा चित्रपट कॅप्टन विक्रम बत्रायांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात कियारा देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.