ही अभिनेत्री तब्बल 16 वर्षे सहन करत राहिली नवऱ्याचा मार

हिंदीबरोबरच तमिळ सिनेमात उमटवला वेगळा ठसा 

ही अभिनेत्री तब्बल 16 वर्षे सहन करत राहिली नवऱ्याचा मार

मुंबई : हिंदी आणि तमिळ सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री रति अग्निहोत्री हिचा आज 58 वा वाढदिवस. रतिचा जन्म मुंबईतील पंजाबी कुटुंबात झाला. रतिने वयाच्या 10 व्या वर्षांपासूनच मॉडेलिंगला सुरूवात केली. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. 

रति 16 वर्षांची असताना तिचे वडिल कुटुंबासोबत चेन्नईत शिफ्ट झाले. तिथे शिक्षणाबरोबरच ती अभिनय देखील करत असे. त्याचवेळी त्यावेळेचे तमिळ लोकप्रिय दिग्दर्शक भारती राजा यांनी आपल्या सिनेमाकरता नवीन अभिनेत्रीची शोध होती. 

तसेच एकदा भारती राजा यांनी रतिला शाळेत एका नाटकात अभिनय करताना पाहिल त्यानंतर त्यांनी लगेच रतिच्या वडिलांची भेट घेतली. तसेच त्यांनी रतिच्या वडिलांना शब्द दिला की ते अगदी एका महिन्यात हा सिनेमा करतील. 

तेव्हा रतिच्या वडिलांनी सिनेमाकरता परवानगी दिली. त्यानंतर रतिने 16 वर्षांची असताना 'पुदिा वरपुकल' या सिनेमांत काम केलं. 1979 मध्ये हा सिनेमा ब्लॉकब्लस्टर ठरला.

या सिनेमाच्या अभिनेत्याने भाग्यराजाने रतिला तामिळ शिकवलं. ते तिला हिंदीत डायलॉग लिहून देत असतं. लवकरच रति तमिळ भाषा देखील शिकली. तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं देखील की, ती चुकून पंजाबी कुटुंबात जन्मली... पण ती मनापासून तमिळच आहे. 

हा सिनेमा केल्यानंतर ती एका रात्रीतच स्टार बनली. यानंतर तिच्याकडे सिनेमांची लाईनच लागली. तिने 3 वर्षांत तब्बल 32 कन्नड आणि तेलुगु सिनेमे केले. तिने तामिळचे मोठे स्टार्स रजनीकांत, कमल हसन, शोभन बाबू, चिंरजीवी आणि नागेश्वर रावसोबत काम केलं आहे. 

रतिने 1981 मध्ये बॉलिवूड सिनेमा 'एक दूजे के लिए'मध्ये कमल हसन यांच्यासोबत काम केलं. हा सिनेमा अगदी सुपरहिट ठरला. यानंतर रतिने 43 हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. आजही तिचा हा सिनेमा सुपरहिट ठरला. 

रतिच्या लग्नाअगोदरच तिच्या वडिलांचे निधन झाले. तिने 1985 मध्ये आर्किटेक्ट अनिल वीरवानीसोबत लग्न केलं. लग्नानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीला निरोप दिला. 1987 मध्ये तिला तनुज नावाचा सुंदर मुलगा झाला. त्यानंतर ती कुटुंबात व्यस्त झाली. 

लग्नाच्या तब्बल 30 वर्षांपर्यंत रति लाइमलाइटपासून दूर राहिली. पण एक दिवस अचानक त्या पोलिस स्टेशनमध्ये आल्या. प्रत्येकजण त्यांना पोलिस स्टेशनमध्ये पाहून चक्रावलं. तिथे तिने आपल्या नवऱ्याविरोधात मारहाण, धमकी देणे असे आरोप लावले. 

तिने एका मुलाखतीत आपल्या नवऱ्याविरोधात मुलाखत दिली. रति म्हणाली की ती 30 वर्षे हे फक्त आपल्या मुलासाठी सहन करत राहिली. पण तिला या अन्यायाविरूद्ध आवाज उठवायचा होता तो तिने उठवला. 

2015 मध्ये रतिने आपल्या नवऱ्याला घटस्फोट दिला. आणि 16 वर्षांच्या तनुजसोबत राहू लागली. 2001 मध्ये पुन्हा सिनेमांत वापसी केली. 

काजोलच्या 'कुछ खट्टी कुछ मीठी' या सिनेमात आईची भूमिका केली. त्यानंतर 'यादें' 'देव'या सिनेमांत काम केलं. सोबतच तब्बल 20 वर्षांनंतर साऊथ इंडियन सिनेमातही एन्ट्री घेतली.