मुंबई : झगमगत्या विश्वात कायम चर्चेचा विषय असतो, तो म्हणजे सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यातील गोष्टी. नुकताचं दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) तुफान चर्चेत आला आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कराण देखील तसं आहे, मध्यरात्री करणच्या घरी एक अभिनेत्री शॉर्टमध्ये आली. अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मध्यरात्री करणच्या घरी आलेली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कृती सेनन (Kriti Sanon)आहे.
करणने रविवारी रात्री घरी सेलिब्रिटींसाठी पार्टी ठेवली होती. त्याच्या पार्टीला कृती देखील पोहोचली होती. याच दरम्यान फोटोग्राफर्सने कृतीला कॅमेऱ्याक कैद केलं. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांना घायाळ करत आहे. पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींना हजेरी लावली.
करण जोहरच्या पार्टीमध्ये कृती छोटा ड्रेस घालून पोहोचली होती. कृतीने मरून रंगाचा वन पिस घातला होता. त्यामध्ये ती प्रचंड बोल्ड दिसत आहे. तिची एक झलक पाहाण्यासाठी अनेकांनी एकचं गर्दी केली.
कृतीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती नुकताचं 'बच्चन पांडे' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. त्यानंतर अभिनेत्री आता 'गणपत' सिनेमात झळकणार आहे. कृती सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.