Video: Adipursh च्या टीझर कार्यक्रमात प्रभासला फुटला घाम, Kriti Sanon कृतीमुळे उपस्थितांच्या भुवय्या उंचावल्या

सुपरस्टार प्रभास आणि क्रिती सेनोन स्टारर यांच्या 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट रामायण या पौराणिक कथेवर आधारीत आहे. या चित्रपटात प्रभास प्रभू रामचंद्र, सैफ अली खान रावण आणि क्रिती सेनोन सितेची भूमिका साकारत आहे.

Updated: Oct 3, 2022, 02:30 PM IST
Video: Adipursh च्या टीझर कार्यक्रमात प्रभासला फुटला घाम, Kriti Sanon कृतीमुळे उपस्थितांच्या भुवय्या उंचावल्या  title=

Adipurush Teaser Prabhas And Kriti Senon: सुपरस्टार प्रभास आणि क्रिती सेनोन स्टारर यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट रामायण या पौराणिक कथेवर आधारीत आहे. या चित्रपटात प्रभास (Prabhas) प्रभू रामचंद्र, सैफ अली खान (Saif Ali Khan) रावण आणि क्रिती सेनोन (Kriti Sanon) सितेची भूमिका साकारत आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, मलयालम आणि कन्नड या भाषेथ टीझर लाँच करण्यात आला आहे. 

या चित्रपटाच्या टीझर लाँचिंगसाठी चित्रपटातील कलाकार आणि क्रू मेंबर उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाले होते. यावेळी प्रभास आणि क्रिती सेनोन यांची अनोखी मैत्री पाहायला मिळाली. स्टेटवरील लाईटमुळे प्रभासला वारंवार घाम फुटत होता. त्यामुळे असह्य झालेल्या प्रभासला क्रिती सेनोननं घाम पुसण्यासाठी दुप्पटा दिला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.  त्याचबरोबर ती प्रभासकडे पाहून हसताना दिसत आहे. 

बाहुबली स्टारला प्रभू रामच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. प्रभासचे ट्रान्सफॉर्मेशन लोकांची मने जिंकत आहे. या दोघांची मैत्री पाहून काहीतरी सुरु आहे असा अंदाज फॅन्स लावत आहेत. व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले की, कृपया प्रभासचा हात सोडू नका.