Naatu Naatu वर जेव्हा लॉरेन एन्ड हर्डी थिरकतात तेव्हा... Video पाहून फूटेल हास्याचा फवारा!

Naatu Naatu and Lauren and Hardy: नाटू नाटू या गाण्यानं सध्या सगळीकडेच हल्लाबोल केला आहे. एक एक मोठमोठ्या आतंरराष्ट्रीय पुरस्कारांवर त्यांनी आपली मोहोर उमटवली आहे. त्यामुळे सध्या या गाण्याचीच सगळीकडे चर्चा आहे

Updated: Jan 27, 2023, 06:50 PM IST
Naatu Naatu वर जेव्हा लॉरेन एन्ड हर्डी थिरकतात तेव्हा... Video पाहून फूटेल हास्याचा फवारा! title=

Naatu Naatu and Lauren and Hardy: नाटू नाटू या गाण्यानं सध्या सगळीकडेच हल्लाबोल केला आहे. एक एक मोठमोठ्या आतंरराष्ट्रीय पुरस्कारांवर त्यांनी आपली मोहोर उमटवली आहे. त्यामुळे सध्या या गाण्याचीच सगळीकडे चर्चा आहे. गोल्डन ग्लोब या नामांकित आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं नाटू नाटू (Naatu Naatu Golden Globe) हे गाणं सन्मानित झालं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर #NaatuNaatu हे गाणंही ट्रेण्ड होतं आहे. या गाण्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा नाटू नाटू या गाण्याची क्रेझ चढली आहे. त्यामुळे हा हॅशटॅगही सगळीकडे ट्रेण्ड होतो आहे. त्यात सध्या असाच अजून एक व्हिडीओ सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो आहे आणि तो म्हणजे नाटू नाटू या गाण्याचे असेच एक स्पूफ. (Lauren and hardy spoof video goes viral on social media dancing on naatu naatu song)

नाटू नाटू हे गाणं प्रथम आल्यानंतर या गाण्याची जोरात क्रेझ होती. तेव्हा तर या गाण्याचा सगळीकडेच ट्रेण्ड होता त्यामुळे या गाण्याच्या स्टेपशी मिळते जुळते रिल्सही काही चित्रपटांच्या नाचाच्या स्टेप्सशी जुळवून ते व्हायरल केलेले होते. त्यात अशाच एका विनोदी इंग्रजी सिरियलच्या एका डान्सचा (Dance Video) व्हिडिओही सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसतो आहे. ही सिरियल होती लॉरेन एन्ड हार्डीची (Lauren and Hardy). तुमच्या लहानपणीही तुम्ही ही सिरियल पाहिली असेल. ही सिरियल तेव्हा खूप लोकप्रिय झाली होती. याच गाण्यातील एक प्रसंग नाटू नाटू या गाण्याशी जोडला आहे आणि त्याचे स्पूफ केले आहे. 

तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून नक्कीच हसू फुटले. नाटू नाटू या गाण्याशी अनेक स्टेप्स त्यांनी सिरियलमध्ये केलेल्या एका डान्सशी खूप मिळत्याजुळत्या आहेत. त्यामुळे बॅकग्राऊंडला (Background Naatu Naatu Song) फक्त नाटू नाटूचं गाणं आणि त्याच्यासोबतीलाच एक लॉरेन आणि हार्डीचा डान्स असं स्पुफ तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या नाटू नाटू या गाण्यामुळे हा व्हिडीओही पुन्हा एकदा ट्रेण्डमध्ये येतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आनंदा होईल. सध्या हा व्हिडीओ सगळ्याच सोशल साईट्सवर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. अनेक युझर्सनी हा व्हिडीओ (Viral Video) व्हायरल केला आहे. त्यामुळे यावर अनेक नेटिझन्स आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. सोबतच हा व्हिडीओ सगळेच (Naatu Naatu Viral Video Spoof) एन्जॉय करताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तुम्हीही जरा का हा व्हिडीओ पाहिला नसेल तर आत्ताच पाहा. तुम्ही हा व्हिडीओ नक्कीच एन्जॉय कराल.