Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी

या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते 'बिग बी' अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांना दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. 

Updated: Aug 24, 2022, 12:03 AM IST
Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी title=

Amitabh Bachchan Covid 19 : या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.  ज्येष्ठ अभिनेते 'बिग बी' अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांना दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. अमिताभ यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. “माझा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी भेट घेतलेल्या प्रत्येकाने कोरोना टेस्ट करावी, असं आवाहन अमिताभ यांनी ट्विटद्वारे केलं आहे.  (legendary actor amitabh bachchan aka big b again tested corona positive his give info via twitter)

मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने मंगळवारी संध्याकाळी आकडेवारी जाहीर केली. त्या आकडेवारीनुसार मुंबईत 1 हजार 355 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर राज्यात एकूण 1 हजार 910 जणांना कोरोनाची बाधा झाली.