अभिनेत्री हेलन ही सलमानची सावत्र आई, पण तो तिला कधीच सावत्र मानत नाही कारण...

हेलन यांच्या प्रेमात सलीम ईतके वेडे झाले की, या दोघांनी 1980 मध्ये लग्न केलं.

Updated: May 9, 2021, 03:53 PM IST
अभिनेत्री हेलन ही सलमानची सावत्र आई, पण तो तिला कधीच सावत्र मानत नाही कारण...

मुंबई : ५०-६०च्या दशकात हिंदी सिनेमावर राज्य करणाऱ्या हेलन 82 वर्षांच्या आहेत. हिंदी सिनेमातील सर्वात लोकप्रिय कॅबर क्वीन म्हणून काम करणार्‍या हेलन यांनी आपल्या नृत्याद्वारे केवळ लोकांची मनं जिंकली नाहीत तर प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना सुद्धा आपल्या प्रेमात पाडलं. नंतर लगेजच या दोघांनी लग्नगाठ बांधली.

कुटुंब या लग्नावर नाखुश होते
सलीम खान यांनी सुशीला  सुशीला चरकशी 5 वर्ष डेटिंग केल्यानंतर 1964 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर सुशीला चरक यांनी नाव बदलून सलमा खान असं ठेवलं. सलीम आणि सलमा खान यांना सलमान, अरबाज आणि सोहेल, आणि एक मुलगी, अलवीरा अशी चार मुलं आहेत. पण हेलनच्या प्रेमात सलीम ईतके वेडे झाले की. या दोघांनी 1980 मध्ये लग्न केलं.

लग्नानंतर खान कुटुंबात बराच परकेपणा होता. सलमानसह तिन्ही भाऊ पूर्णपणे हेलेन यांच्या विरोधात होते. खुद्द सलमा खानसुद्धा या लग्नामुळे नाखूश होत्या. एका मुलाखतीत याचा खुलासा करत सलमा म्हणाल्या की, 'या लग्नामुळे मी खूपच उदास आणि विचलित झाली आहे'. सलमान, अरबाज आणि सोहेल हेलन यांच्याशी बोलले देखील नव्हते.

या मुलाखतीत सलीम खान यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत असंही म्हटलं होतं की, मी या लग्नाच्या विरोधात होते म्हणून माझी मुलं देखील या लग्नाच्या विरोधात होती. पण असं म्हणतात. ना  काळापेक्षा काही मोठं नाही. हळूहळू तीन भाऊ आणि स्वत: सलमा खान यांना हेलन वाईट नाही हे पटू लागंलं. त्यांनी तिचा विचार केला पाहिजे एकदा असं सगळ्यांना वाटू लागलं. उलट ती खूप चांगली आहे ती सर्वांची काळजी घेते.

यानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र आलं. मग सगळं कुटुंबिय एकत्रितपणे प्रत्येक सोहळा साजरा करु लागला. काही घटना अशा घडल्या आहेत की ज्यामुळे हेलनवर संपूर्ण खान कुटुंब जीव ओवाळून टाकू लागलं.  राहीली गोष्टा हेलन यांची तर, हेलन या सलीम यांच्यावर तेव्हापासून फिदा होत्या. जेव्हा पासून हेलेन यांना सलिम यांनी आर्थिक संकटात मदत केली होती.

लग्नानंतर हेलन आणि सलीम खान यांना मुलं नसल्यामुळे त्यांनी अर्पिता खानला दत्तक घेतलं. अर्पिता खान कुटुंबाचं आयुष्य बनलं. तिघेही भाऊ अर्पितावर खूप जास्त प्रेम करतात. खासकरुन सलमान खानसोबत अर्पिताची बॉन्डिंग खूप खास आहे.

8 नोव्हेंबर २०१४रोजी, हैद्राबादच्या हॉटेल फलकनुमा पॅलेसमध्ये अर्पिता आयुष शर्मासोबत लग्न बंधनात अडकली. मार्च २०१६ मध्ये तिचा मुलगा अहिलचा जन्म झाला. त्याचवेळी, ती 2019 मध्ये मुलगी आयतची आई बनली. अर्पिताने अर्जुन कपूरलाही डेट केलं आहे.