शाहरुख बायको गौरीला सर्वांसमोर म्हणाला..."गौरी बुरखा घाल, घराबाहेर जायचं नाही, तुझं नाव आयशा ठेवलंय.."

शाहरुखचं बोलणं ऐकून पाहुणे आणि गौरीचे कुटुंबीय आश्चर्यचकित झाले होते.

Updated: May 9, 2021, 03:27 PM IST
शाहरुख बायको गौरीला सर्वांसमोर म्हणाला..."गौरी बुरखा घाल, घराबाहेर जायचं नाही, तुझं नाव आयशा ठेवलंय.."

मुंबई : शाहरुख खानची लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी स्टोरी पेक्षा कमी नाही. शाहरुख आणि गौरी शाळेच्या दिवसांपासूनच एकमेकांवर प्रेम करतात. बर्‍याच वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनीही आपल्या प्रेमापोटी आपल्या घरच्यांना सांगितलं होतं. मात्र, शाहरुख मुसलमान असल्यामुळे गौरीच्या कुटुंबीयांनी आधी या लग्नाला नकार दिला, मात्र नंतर अखेर कुटुंबीय त्यांच्या प्रेमापुढे हार मानली.

या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली. या दोघांनी लग्न केलं. पण लग्नादरम्यान एक मनोरंजक किस्सादेखील घडला, त्याबद्दल स्वत: शाहरुखने एका मुलाखतीत सांगितलं. अभिनेत्री फरीदा जलालने शाहरुखची एक मुलाखत घेतली होती, जी आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहरुख म्हणाला- बुरखा घाल, गौरी!
या मुलाखतीमध्ये शाहरुखने आपल्या लग्नाच्या रिसेप्शनचा एक किस्सा शेअर केला आहे. शाहरुख म्हणाला, 'लग्नाच्या रिसेप्शनमध्ये रात्री १.३० वाजता जेव्हा मी पाहुण्यांमध्ये पोहोचलो तेव्हा गौरीचे नातेवाईक हळू- हळू चर्चा करत होते की, मुलगा मुसलमान आहे, तो मुलीचा धर्म बदलेल का?

हे ऐकून शाहरुख गौरीकडे गेला आणि सर्वांसमोर तिला म्हणाला - गौरी उठ, बुरखा घाल, नमाज वाच. हे ऐकून पाहुणे आणि गौरीचे कुटुंबीय आश्चर्यचकित झाले.

यानंतर शाहरुख म्हणाला, आतापासून गौरी बुरखा घालेल, घराबाहेर पडणार नाही, तिचं नाव आयशा ठेवलं आहे मी आणि आता तिला असंच राहावं लागेल. हे ऐकून पाहुण्यांना वाटलं की, नुकतंच त्यांचं लग्न झालं आहे. शाहरुखने तिला आतापासून हे सगळं करायला सांगतोय. मात्र जेव्हा शाहरुख गंमत करत आहे, हे सगळ्यांना कळलं तेव्हा सगळ्यांच्या जिवात जीव आला

हिंदू रीति-रिवाजांनुसार 25 ऑक्टोबर 1991 रोजी त्यांचं लग्न झालं. आता या दोघांच्या लग्नाला 29 वर्ष झाली आहेत. या दोघांना आर्यन, सुहाना आणि अब्राम अशी तीन मुलं आहेत.