मुंबई : सिनेसृष्टीतून एका पाठोपाठ एक वाईट बातमी येत आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. नुकतंच गायक लकी अली यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर मंगळवारी संध्याकाळपासून समोर आली. चाहते देखील लकी अलीकरता ट्विट करू लागले. (Lucky Ali is on his farm in Bengaluru with his family and doing well, informs Nafisa Ali) त्यांच्या म्हणण्यानुसार, लकी अली यांचं कोविड-19 मुळे निधन झालं. मात्र या गोष्टीत काहीच तथ्य नाही. यावर लकी अली यांची जवळची मैत्रिण नफीसा अली यांनी ट्विट करून सत्य समोर आणलं.
गेल्या अनेक काळापासून लकी अली लाइमलाइटपासून दूर आहे. अनेकदा लकी अली यांच्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली असते. कोविडमुळे लकी अली यांच्या निधनाची चर्चा खूप मोठी आहे.
He will be always remembered for his unique hmmm voice #LuckyAli #Covid pic.twitter.com/oy3Zg23K7z
— Tweetera (@DoctorrSays) May 4, 2021
यावर नफीसा अली यांनी ट्विट केलं आहे. 'लकी पूर्णपणे बरा आहे. आजच दुपारी आमच्या दोघांच बोलणं झालं आहे. तो आपल्या फार्मवर कुटुंबासोबत आहे. कोविड झालेला नाही तो अतिशय उत्तम आहे.'
Lucky is totally well and we were chatting this afternoon. He is on his farm with his family . No Covid . In good health.
— Nafisa Ali Sodhi (@nafisaaliindia) May 4, 2021
लकी अली सध्या सोशल मीडियावर फारसे चर्चेत नसले तरीही ९०च्या दशकात त्यांचे म्युझिक व्हिडीओ आणि गाण्यांनी जगभरात लोकप्रियता मिळवली होती. आताही अनेकदा त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आजही त्यांचा बराच मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे चाहते त्याच्या आगामी म्युझिक अल्बमची आतुरतेनं वाट पाहत आहेत.