'लुका छिपी' सिनेमाचा गल्ला वाढता वाढता वाढे...

27 कोटींच्या बजेट मध्ये तयार झालेल्या सिनमाने बॉक्स ऑफिसवर 40 कोटींचा गल्ला पार केला आहे.

Updated: Mar 5, 2019, 04:33 PM IST
'लुका छिपी' सिनेमाचा गल्ला वाढता वाढता वाढे... title=

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कृति सेनन स्टारर 'लुका छिपी' सिनेमा 1 रोजी सिनेमागृहात दाखल झाला. सिनेमागृहात दाखल होताच सिनेमाने 8 कोटींचा गल्ला जमवला. 'लुका छुपी' कार्तिक आर्यनचा आतापर्यंतची सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाचे चांगली कमाई केली आहे. 27 कोटींच्या बजेट मध्ये तयार झालेल्या सिनमाने बॉक्स ऑफिसवर 40 कोटींचा गल्ला पार केला आहे.

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन सिनेमाच्या कमाईचा आकडा शेअर केला. शुक्रवारी सिनेमाने 8.01 कोटी रूपयांचा गल्ला जमवला असून शनिवारी 10.08 कोटींपर्यंत मजल मारली. त्यानंतर चाहत्यांनी संडे हा फन डे साजरा करत सिनेमाने रविवारी 14.04 कोटी रूपयांची कमाई केली आणि सोमवारी सिनेमाने 7.90 कोटींचा गल्ला जमवला. आता 'लुका छिपी' बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

सिनेमात कार्तिक 'गुड्डू' आणि कृती 'रश्मी' या भूमिका साकारत आहेत. कार्तिक आणि कृती व्यतिरिक्त सिनेमात अपारशक्ती खुराना, विनय पाठक आणि पंकज त्रिपाठी यांनीदेखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सिनेमाची गाणीही प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय आहे. 'कोका कोला' आणि 'पोस्टर लगवा दो' ही गाणी सिनेमा प्रदर्शनाच्या आधीच हीट ठरली आहेत.