माधुरीच्या बकेट लिस्टचे नवे पोस्टर प्रदर्शित...

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आता मराठी सिनेमात पर्दापण करते आहे.

Updated: Apr 3, 2018, 03:26 PM IST
माधुरीच्या बकेट लिस्टचे नवे पोस्टर प्रदर्शित...

मुंबई : बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आता मराठी सिनेमात पर्दापण करते आहे. माधुरी दीक्षितच्या पहिल्या वहिल्या मराठी सिनेमाचे पोस्टर समोर आले असून आता बाईक रायडिंग करतानाचे माधुरीचे दुसरे पोस्टर समोर आले आहे. २०१४ मध्ये डेढ इश्कीया आणि गुलाब गॅंग या हिंदी सिनेमात झळकल्यानंतर पुन्हा एकदा सिनेमात काम करण्यासाठी ती सज्ज झाली आहे.माधुरीच्या या सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. त्यात माधुरीचा साधा सिंपल लूक पाहायला मिळाला. कारण यात माधुरी एका हाऊसवाईफ म्हणजेच गृहिणीची भूमिका निभावत आहे. या सिनेमात अभिनेत्री रेणुका शहाणेही दिसेल. रेणुका आणि माधुरी हम आपके है कौन नंतर २३ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत.

पहा सिनेमाचे दुसरे पोस्टर...

 सिनेमाचा टीझर...

सिनेमात माधुरी मधुरा साने या मराठमोळ्या गृहिणीची भूमिका साकारत आहे. यात मधुरा एक चांगली पत्नी, सून आणि आई असते. सारे काही सुरळीत चालू असताना तिच्या आयुष्यात सई येते. आणि मधुराला आपली सर्व स्वप्ने पुन्हा जगावीशी वाटतात. तिची बकेट लिस्ट तिला पूर्ण करण्याची इच्छा जागृत होते. पहा सिनेमाचा टीझऱ...

सिनेमाचे जबरदस्त प्रमोशन सुरू

माधुरी दीक्षित या सिनेमाचे जबरदस्त प्रमोशन करत आहे. हा सिनेमाची निर्मिती करण जोहर करत आहे. तर या सिनेमाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देओसकर याने केले आहे. हा सिनेमा २५ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.