मुंबई : आता बॉलिवूडमध्ये #MeToo च्या कॅम्पेनचा परिणाम होताना दिसत आहे.
अनेक अभिनेत्री आपल्यावर झालेले अत्याचार बोलून दाखवत आहेत. तसेच त्यांच्याशी घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेचा उघडपणे उल्लेख केला आहे. यापूर्वी इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउच तसेच बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. आपल्याकडे चित्रपटात रेप सीन अतिशय सामान्य पद्धतीने दाखविले जातात. परंतु जर रेप सीन करण्यास एखाद्या अभिनेत्रीचा नकार असेल अन् तरीही तिच्याकडून तो करून घेतला जात असेल तर ते एकप्रकारचे शोषणच असल्याचा सूर आता व्यक्त केला जात आहे.
On radio today, listened to Annu Kapoor tell the sickening story of how a young, petrified Madhuri Dixit was forced to film a "rape scene" with Ranjit because her director Bapu insisted she couldn't back out. "Rape scene toh hoga," he told her.
— Zehra Kazmi (@ArhezImkaz) December 24, 2017
एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार अभिनेता अनु कपूर यांनी नुकताच एका रेडिओवर असा खुलासा केला, जे वाचून तुम्ही चकित व्हाल. अनु कपूर यांच्या मते, धकधक आणि डान्सिंग गर्ल माधुरी दीक्षित हिच्यावर रेप सीन करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यांनी रेडिओवर म्हटले की त्यावेळी माधुरीला असे काही फोर्स करण्यात आले होते. ज्यामुळे ती रेप सीन करण्यास नकार देऊ शकली नाही. दिग्दर्शकांनी तर अगोदरच स्पष्ट केले होते की, रेप सीन करावाच लागेल.
अशी झाली #MeeToo ला सुरूवात
हॉलिवूड निर्माता हार्वे वाइनस्टाइन याच्याविरोधात अनेक दिग्गज अभिनेत्रींनी आवाज उठविल्यानंतर या कॅम्पेनला सुरुवात करण्यात आली. जेव्हापासून जगभरात ‘#MeeToo’ या नावाने कॅम्पेन चालविले जात आहे तेव्हापासून विविध देशांमधील मोठमोठ्या सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या लैंगिक शोषणाशी निगडित घटनांचा खुलासा करीत आहेत.