'महाभारत' फेम अभिनेत्याचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनामुळे अभिनेत्याची प्रकृती फार चिंताजनक होती. 

Updated: Apr 11, 2021, 02:35 PM IST
'महाभारत' फेम अभिनेत्याचा कोरोनामुळे मृत्यू title=

मुंबई : अभिनेते आणि दिग्गज कलाकार सतीश कौल यांचा कोरोनामुळे मुंबईत मृत्यू झाला आहे. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कौल यांनी 'महाभारत' मालिकेत इंद्रदेवाची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी महानायक अनिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्यासोबत देखील स्क्रिन शेअर केली होती. मीडिया रिपोरर्ट्सनुसार त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. 

आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांनी उपचारासाठी फिल्म इंडस्ट्रीकडून आर्थिक मदत देखील मागितली होती. मी औषध आणि मुलभूत सुविधांसाठी मोठा संघर्ष करत आहे. असं देखील कौल म्हणाले होते. कोरोनामुळे त्यांची प्रकृती फार चिंताजनक होती. अखेर कोरोना व्हायरसशी झुंज देताना त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. 

सतीश कौल यांनी ‘प्यार तो होना ही था’, ‘आंटी नंबर वन’, ‘विक्रम और बेताल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. ते पंजाबमधून मुंबईत त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण देखील केलं.