धोनीच्या लेकीचा गाण्याचा cute व्हिडिओ पाहिलात का?

झिवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Updated: Jan 7, 2020, 05:38 PM IST
धोनीच्या लेकीचा गाण्याचा cute व्हिडिओ पाहिलात का?
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) सध्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. धोनीने या सुट्ट्यांमधील त्याच्या मुलीचा झिवाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये झिवा इंग्लिश गाणं बोलत, त्यावर गिटार वाजवताना दिसतेय. झिवाच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगली पसंतीही मिळतेय. 

धोनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये झिवा 'लँड ऑफ हार्मनी' हे गाणं गातेय. गाणं गाताना झिवा गिटार वाजवतानाही दिसतेय. 'Snow brings the best out of her' अशा कॅप्शनसह धोनीने हा व्हिडिओ शेअर केलाय. 

 
 
 
 

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

याआधी धोनीच्या पत्नीने साक्षीने इन्स्टाग्रामवर धोनी आणि झिवाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये धोनी आणि झिवा एकत्र मिळून स्नोमॅन बनवत असल्याचं पाहायला मिळतंय. 

 
 
 
 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

सध्या धोनी क्रिकेटपासून दूर आहे. २०१९च्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये धोनीला पाहण्यात आलं होतं. गेल्या काही महिन्यापूर्वी धोनी सीमेवर जवानांसोबत होता.