अनिल कपूरच्या 'या' वागणुकीमुळे महेश बाबू अवघडला, साऊथ सुपरस्टारने स्टेजवरच जोडले हात

Mahesh Babu Left Stage : हैदराबादमध्ये 'अ‍ॅनिमल'चा रिलीजपूर्व कार्यक्रम होता. मंचावर बॉबी देओल आणि अनिल कपूर होते. त्यानंतर अनिल कपूरने साऊथ सुपरस्टार महेश बाबूला काहीतरी करून दाखविण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे अभिनेत्याला स्टेजवरच लाज वाटली. व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या काय आहे प्रकरण.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 28, 2023, 12:31 PM IST
अनिल कपूरच्या 'या' वागणुकीमुळे महेश बाबू अवघडला, साऊथ सुपरस्टारने स्टेजवरच जोडले हात title=

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना स्टारर सिनेमा 'अ‍ॅनिमल' ची भरपूर क्रेझ पाहायला मिळत आहे. या सिनेमाला पॅन इंडिया रिलीज केलं जात आहे. त्यामुळे सिनेमा संपूर्ण देशात प्रमोट करण्यात येत आहे. नुकताच या सिनेमाचा प्रमोशन सोहळा हैदराबादमध्ये झाला. ज्यामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदानासोबत सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होते. येथे महेश बाबू देखील पोहोचला होता. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कार्यक्रमादरम्यान अनिल कपूर आणि बॉबी देओल स्टेजवर दिसत आहेत, यादरम्यान अनिल कपूर महेश बाबूला स्टेजवर बोलावतो. महेश बाबू यायला कचरत असताना अनिल कपूर म्हणाले की,  ही माझी ऑर्डर आहे, तुम्ही या. अनिल कपूर असं म्हणत असताना महेश बाबू स्टेजवर पोहोचला. महेश बाबू स्टेजवर गेल्यावर अनिलने हस्तांदोलन करून स्वागत केले. यानंतर अनिल नाचायला लागतो आणि महेश बाबूलाही नाचायला सांगतो. पण महेश बाबूला खूप लाज वाटते. तो इकडे तिकडे बघू लागतो आणि मग अनिल कपूरला मिठी मारतो आणि स्टेजवरुन निघून जातो. 

(वाचा - रणबीर कपूरने महेश बाबूला दाखवला राहाचा फोटो! या व्हिडीओला बघून असंच काहीसं वाटतंय)

अनिल कपूरचा व्हिडीओ

'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची निर्मिती मुराद खेतानी यांच्या सिने१ स्टुडिओ, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांची टी-सीरीज आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्सने केली आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा 5 भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.