Saiee Manjrekar नक्की कोणाला डेट करतेय? यावर पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री

डेटींगबाबत तिने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Feb 2, 2022, 12:50 PM IST
 Saiee Manjrekar नक्की कोणाला डेट करतेय? यावर पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री title=

मुंबई : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने प्रभुदेवाच्या 'दबंग 3' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात सलमान खानसोबत सई मुख्य भूमिकेत दिसली होती. सध्या अभिनेत्री तिच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.

एका रिपोर्टनुसार, सई साजिद नाडियादवालाचा मुलगा सुभान नाडियाडवालाला डेट करत आहे, अशी चर्चा सुरु झाली होती. हे जोडपे अनेकदा लंच आणि डिनर डेटवर एकत्र दिसले आहेत. दोघांनी फोटोग्राफर्सना एकत्र फोटो क्लिक करू नका असे सांगितले आहे, असं देखील बोललं जात होतं.नुकतेच हे जोडपे एकत्र दिसले होते.

रिपोर्टनुसार, दोघांनी फोटोग्राफर्सना एकत्र फोटो क्लिक करू नका असे सांगितले. सुभानने आधी कॅमेऱ्यासमोर पोज दिली आणि नंतर त्याच्या कारमध्ये जाऊन बसला. यानंतर सई त्याच कारमधून बाहेर आली, मात्र दोघांनी एकत्र फोटो क्लिक करण्यास नकार दिला. 

आता यावर सईने खुलासा केला आहे. तिने डेटींगच्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. डेटींगबाबत तिने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तिने या सगळ्या चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं आहे. 

सई म्हणाली, " मागची 15 वर्ष मी सुभानला ओळखते. आम्ही बालपणापासून एकमेकांचे मित्र आहोत. आम्ही डिनर, लंचला जात असलो तरी आमचं अफेअर वैगरे नाही. आम्ही दोघंही मैत्री व्यतिरिक्त कोणत्याच नात्यात नाही."