महेश मांजरेकर मुलीच्या भूमिकेबद्दल रोखठोक बोलले, सई नाराज होऊ शकते पण...

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर सध्या त्यांच्या आगामी सिनेमांमुळे चर्चेत आहेत.

Updated: Feb 2, 2022, 03:34 PM IST
 महेश मांजरेकर मुलीच्या भूमिकेबद्दल रोखठोक बोलले, सई नाराज होऊ शकते पण... title=

मुंबई : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर सध्या त्यांच्या आगामी सिनेमांमुळे चर्चेत आहेत. एकापाठोपाठ एक ते सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.बऱ्याचदा महेश मांजरेकर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चाचा विषय ठरतात. ते सोशल मीडियावर देखील कमालीचे अॅक्टीव्ह असतात.

महेश मांजरेकर यांच्यासोबत त्यांची लेक सईदेखील सेलिब्रिटी आहे. तिने प्रभुदेवाच्या 'दबंग 3' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती सतत चर्चेत असते, आता महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत मुलीबद्दल केलेलं विधान खूपच चर्चेत आहे. एकीकडे सई डेटींगमुळे चर्चेत असताना त्यांनी मुलीच्या भूमिकेबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

एका मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले होते की, 'दबंग 3' मधील सईचा अभिनय मला आवडला नाही. हे मी सईलाही सांगितलं आहे.

पुढे सईसोबत काम करताना महेश मांजरेकर म्हणाले, "जर तिच्यासाठी एखादी चांगली भूमिका असेल, ज्या पात्रासाठी मी तिच्याशिवाय इतर कोणालाही पाहू शकत नाही.

मला तिच्यासाठी अशी भूमिका हवी आहे जी तिच्या व्यक्तिमत्त्वानुसार असेल. मी दुसऱ्याच्या भूमिकेची वाह वाह करणार नाही,  कारण ती माझी मुलगी आहे"