'मी अजय देवगणकडे भीक मागितली होती, तू माझ्या...,' महिमा चौधरीने केला खुलासा, 'तो म्हणायचा सगळं...'

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधऱीने (Mahima Chaudhry) नुकतंच आपल्या जीवघेण्या अपघाताबद्दल खुलासा केला आहे. महिमा चौधरी आता अनुपम खेर (Anupam Kher) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'द सिग्नेचर' (The Signature) चित्रपटात झळकणार आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 2, 2024, 02:58 PM IST
'मी अजय देवगणकडे भीक मागितली होती, तू माझ्या...,' महिमा चौधरीने केला खुलासा, 'तो म्हणायचा सगळं...' title=

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) अनुपम खेर (Anupam Kher) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'द सिग्नेचर' (The Signature) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. तब्बल 8 वर्षांनी महिला चौधरी बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. नुकतंच तिने आपल्या जीवघेण्या अपघाताबद्दल खुलासा केला आहे. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल क्या करे' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान हा अपघात झाला  होता. 'रेडिओ नशा'ला दिलेल्या मुलाखतीत महिमा चौधरीने आपण अजय देवगण आणि प्रकाश झा यांना आपण अपघाताबद्दल कुठेही वाच्यता करु नका यासाठी विनंती केली होती असा खुलासा केला आहे. आपल्यावर इंडस्ट्रीत बहिष्कार टाकला जाण्याची भिती होती असंही तिने सांगितलं आहे. 

महिमा चौधरीने जीवघेण्या अपघाताबद्दल केला खुलासा

महिमाने त्या घटनेला उजाळा देताना सांगितलं की, "जेव्हा माझा अपघात झाला तेव्हा चेहऱ्यावर इतके कट आहेत याची मला कल्पनाच नव्हती. मी नंतर बाथरुममध्ये गेल्यावर आरसा पाहिला तेव्हा मला हे लक्षात आलं. त्याआधी मी दिग्दर्शक प्रकाश झा यांना जर फार काही झालं नसेल तर पुन्हा शुटिंग सुरु करुयात असं सांगत होती. कारण डॉक्टरांनी स्कॅन वैगेरे केले होता. त्यावर त्यांनी, नको आपण वाट पाहूयात. आपण नंतर तारखांबद्दल बोलू असं सांगितलं. जेव्हा मी माझा चेहरा पाहिला तेव्हा तो जखमी असल्याचं लक्षात आलं. जेव्हा अजय आणि प्रकाश झा आले तेव्हा सर्वात मी सर्वात आधी त्यांना कृपया कोणालाही माझ्या या स्थितीबद्दल सांगू नका अशी विनंती केली. किमाम करिअर वाचवण्यासाठी मी काय करु शकते यासाठी मला प्रयत्न करु दे असं माझं म्हणणं होतं. प्रोडक्शनमधील कोणीही याबद्दल वाच्यता केली नाही हे आश्चर्यकारक आहे. 20 वर्षानंतर जेव्हा मी खुलासा केला तेव्हाच लोकांना समजलं. हे कौतुकास्पद आहे. मी रोज सेटवर जात होती आणि लोक पाहत होते".

पुढे तिने सांगितलं की, "मी त्यावेळी तरुण असल्याने ज्या काही स्थितीचा सामना करावा लागत होता ते संघर्षमय होतं. सर्जरीनंतर सगळं काही ठीक होईल असं अजय नेहमी सांगत असे. पण माझ्या त्यावर विश्वास नव्हता. मी करिअरसाठी इतर पर्यायांचा विचार करत होती. आजही माझा एक डोळा लहान आहे. त्यावेळी हे फार तणावपूर्ण होतं. मी कधीही कॅमेऱ्याकडे थेट पाहिलं नाही. मी नेहमी चेहरा एका बाजूला झुकवत होती".

महिमा चौधऱीचं करिअर

महिमा चौधरीने सुभाष घई यांच्या रोमँटिक-ड्रामा 'परदेस'मधून शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने 'दाग: द फायर', 'धडकन', 'साया', 'बागबान', 'एलओसी: कारगिल' यासह इतर चित्रपटांमध्ये काम केलं. 

महिमा चौधऱी आता गजेंद्र अहिरे यांच्या 'द सिग्नेचर'मध्ये दिसणार आहे, ज्यात अनुपम खेर, रणवीर शौरी, मनोज जोशी, अन्नू कपूर आणि इतर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. कंगना राणौतच्या आणीबाणीमध्येही तिची  भूमिका आहे.