मलायका - अर्जुनचा रोमांटिक अंदाज पुन्हा व्हायरल

मलायका - अर्जुन बॉलिवूडमधील चर्चेत असलेलं कपल...    

Updated: Mar 25, 2021, 02:49 PM IST
मलायका - अर्जुनचा रोमांटिक अंदाज पुन्हा व्हायरल  title=

मुंबई : झगमगत्या  दुनियेत कायम पार्ट्या सुरू असतात आणि या पार्ट्यांमध्ये अनेक मोठे कलाकार देखील हजेरी  लावतात. आता देखील अमृता अरोराने घरी पर्टी आयोजित केली. ज्यात इंडस्ट्रीचे अनेक बडे स्टार्स आले होते. या पार्टीत सध्या चर्चेत असणारा कपल मलायका अरोरा(Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) देखील आले होते.

बुधवारी रात्री अभिनेत्री अमृता अरोराने (Amrita Arora) हाऊस पार्टीचे आयोजन केले. अनेक सेलिब्रिटी या पार्टीला आले होते पण या पार्टीत सर्वांचे लक्ष फक्त आणि फक्त मलायका आणि अर्जुनवर होतं . रेड शॉर्ट आणि ट्रॅक जॅकेटमध्ये मलायका अरोरा ग्लॅमरस दिसत होती.  अर्जुन कपूर  कॅज्युअल ब्लॅक टी-शर्टमध्ये कूल दिसत होता. 

मलायका, अर्जुन आणि करण जोहर या फोटोमध्ये बसलेले दिसत आहेत. बुधवारी रात्री रंगलेल्या या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये मलायका आणि अर्जुनचा रोमांटीक अंदाज दिसून येत आहे.

बॉलिवूडचं हॉट कपल अर्जुन कपूर  आणि मलायका अरोरा नेहमी चर्चेत असतात. पार्टीला अर्जुन-मलायका एकत्र पोहोचले. तेव्हा त्या  दोघांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.  अमृता अरोराने होस्ट केलेल्या पार्टीमध्ये करण जोहर, नताशा पूनावाला, मनीष मल्होत्रा आणि करिश्मा कपूर उपस्थित होते. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.