Fit to Fat.... कमनीय बांधा असणारी मलायका किती Fat झालीये पाहा...

Fat लूकमध्ये समोर येते तेव्हा... ?

Updated: Nov 25, 2021, 12:09 PM IST
Fit to Fat.... कमनीय बांधा असणारी मलायका किती Fat झालीये पाहा... title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. कमनीय बांधा आणि मादक अदा, अशा रुपाच मलायका समोर आल्यावर प्रत्येकाच्याच काळजाचा ठोका चुकतो. पण, हीच मलायका जेव्हा तिच्या फिट रुपात समोर न येता Fat लूकमध्ये समोर येते तेव्हा... ?

मलायका अरोरा असं नुसतं नाव घेतलं तरीही चेहऱ्यासमोर अभिनेत्री मलायकाचा योगा करतानाचा किंवा एखाद्या स्विमसूटमधला लूक समोर येतो. 

आहार आणि व्यायामाच्या सवयींचा समतोल राखत ही अभिनेत्री वयाच्या 45 वर्षांनंतरही सर्वांच्याच काळजाचा ठाव घेते. पण, आता मात्र ती तिची हीच दिनचर्या विसरलेली आहे.

मलायकाचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाचा चेहरा काहीसा फुललेला दिसत आहे. 

मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ती चक्क Non Stop डोनट्स खाताना दिसत आहे. डोनट्स खात असताना मलायका चांगलीच Fat झालेली दिसत आहे. 

मलायकाप्रमाणेच तिच्यासोबत दिसणारा टेरेन्सही डोनट्स खाल्ल्यामुळं काहीसा स्थुल झालेला दिसत आहे. 

भूक लागलीये का.... ? असं म्हणत टेरेन्सनं मलायकासोबतचा व्हिडीओ शेअर केला आणि यावरच नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या.

कायमच वेगळ्या रुपात चाहत्यांसमोर येणाऱ्या या सेलिब्रिटींचा हा Hungry लूक तुम्हाला कसा वाटला?