मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. दोघांची केमिस्ट्री खूप आवडली आहे. या जोडप्याला अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. दरम्यान, मलायकाने तिच्या आवडत्या जोडीदाराबद्दल खुलासा केला आहे. महत्वाचं म्हणजे मलायकाने आपल्या जवळच्या व्यक्तीमंध्ये अर्जुन कपूरचं नाव घेतलेलं नाही. मग ती व्यक्ती कोण?
मलायका अरोराने सोमवारी बहीण अमृता अरोराचा वाढदिवस साजरा केला. मलायकाने अमृताला तिच्या वाढदिवसाच्या खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आणि तिला आपला आवडता जोडीदार म्हटले.
मलायकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती अमृतासोबत वर्कआउट करताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी शांत राहू शकत नाही कारण आज अमृताचा वाढदिवस आहे आणि हा खास दिवस साजरा करण्याचा याहून चांगला मार्ग कोणता आहे.
तिने पुढे लिहिले की, मला नेहमी माझ्या जोडीदारासोबत वर्कआउट करायला आवडते आणि अमृता अरोरा माझी आवडती आहे यात शंका नाही. तुम्हाला कोणासह वर्कआउट सेशन करायला आवडते? तुमच्या जोडीदारासोबत की अजून कुणासोबत आपला व्हिडीओ शेअर करा, असं आवाहन देखील तिने आपल्या चाहत्यांना केलं आहे.
मलायका अरोरा हिने अमृताचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला ज्यामध्ये तिच्या जवळच्या मैत्रिणी करीना कपूर आणि करिश्मा कपूर देखील सहभागी झाल्या होत्या. या वाढदिवसाच्या पार्टीची झलक करीना कपूरने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. फोटोमध्ये मलायका, अमृता, करीना आणि करिश्मा कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसल्या. यावेळी सर्वजण काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत होते.