मुंबई : मुंबईच्या एका प्रसिद्ध छायाचित्रकाराने अभिनेत्री मलाइका अरोराचे शॉर्टस घातलेले फोटो सोशल मीडियावर शेयर केले. तिचा हा फोटो अनेकांना आवडला आणि अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या. ट्रोलरनंही ही संधी सोडली नाही.
'मलाइका अरोराने घटस्फोट हौस - मौज करण्यासाठी घेतलाय' असं म्हणत एका ट्रोलरनं मलाइकाच्या खाजगी आयुष्याबद्दल कमेंट केली. एव्हढच नव्हे तर कपडे कशा पद्धतीनं परिधान केले पाहिजे, याबद्दल अनाहूत सल्लेही तिला मिळाले. यामुळे एरव्ही शांत असलेली मलाइका मात्र चांगलीच वैतागली.
एका यूजरने म्हटले, तिचे आयुष्य फक्त छोटे कपडे घालण्यात, जिम, सलून आणि सुट्टीत गेलंय. तुमच्याकडे चांगले काम नाही का फक्त नवऱ्याच्या पैशांवर मज्जा मारायचीय. तर एका 'फील गुड फॅब्रिक' नावाच्या युजरने 'आजकाल बायका अगोदर श्रीमंत मुलाबरोबर लग्न करून नंतर त्याच्याकडे घटस्फोट मागतात... आणि पोटगीदाखल मिळालेल्या पैशांवर आपली हौस-मौज पुरवतात. तू स्वत: कमवू शकते. मग पोटगीची काय गरज आहे. मी लोकांचा आदर करतो... स्त्री - पुरुष असा भेदभाव नाही' असं म्हणत सोशल मीडियावर मलायकावर टीका केली.
यावर भडकलेल्या मलाइकानं 'काहीही माहित नसताना तुम्ही असं बोलूच कसं शकता. तुमचे बोलणे पूर्णत: चुकीचं आहे. मी काय करायला हवं, हा माझा व्ययक्तिक प्रश्न आहे. तुम्ही स्वत:चा वेळ वाया घालवतायत... तुम्ही आयुष्यात काहीच केलेलं नाही आणि भविष्यातही काही करू शकणार नाही, असं म्हणत या ट्रोलर्सना प्रत्युत्तर देत त्यांची तोंडं बंद केली.