CoronaVirus : मराठीतील सर्वात स्टायलिश अभिनेता कोरोनाच्या विळख्यात

मालिकेचं शुटिंग करत असताना झाली कोरोनाची लागण 

Updated: Apr 21, 2021, 03:12 PM IST
CoronaVirus : मराठीतील सर्वात स्टायलिश अभिनेता कोरोनाच्या विळख्यात title=

मुंबई : कोरोनाने नाही नाही म्हणता मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना गाठलं. मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे जे आपल्या अभिनयासोबत फिटनेससाठी ओळखले जातात त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता अशोक शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. 

सर्व प्रकारची काळजी घेतल्यानंतर मला कोरोनाची लागण झाली आहे. क्वारंटाइन केले असून सर्व औषधोपचार सुरू आहेत. आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्यावी अशी विनंती त्यांनी आपल्या पोस्टमधून केली आहे. 

Posted by Aashok Shinde on Tuesday, April 20, 2021

फिटनेससाठी ओळखले जाणारे अभिनेते अशोक शिंदे यांना काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला होता. सध्या 'स्वाभिमान' या मालिकेतून ते प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या मालिकेचं चित्रीकरण करत असताना ते आजारी पडले आणि कसलाही वेळ न दवडता त्यांनी लगेच उपचारासाठी पावलं उचलली.

मंगळवारी ज्येष्ठ अभिनेता किशोर नांदलस्कर यांचे कोरानाने निधन झाले आहे. ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे आज निधन झालं आहे. गेले चार दिवस ते ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबात पत्नी लक्ष्मी आणि तीन विवाहित मुलं आहेत, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. २०१६मध्ये त्यांना शारीरिक त्रास सुरू झाला. नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये व्यग्र असलेल्या नांदलस्कर यांनी त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं. वैद्यकीय तपासण्यातून हृदयविकार, मधुमेह असल्याचे समोर आलं होत.  त्यांची ‘बायपास’ झाली होती मात्र यातुनही ते सावरले होते मात्र कोरोनामुळे त्यांच आज निधन झालं.