'माझं घर माझा संसार' सिनेमातील अभिनेत्रीबद्दल वाचून बसेल धक्का

एकाच सिनेमातून प्रकाशझोतात 

'माझं घर माझा संसार' सिनेमातील अभिनेत्रीबद्दल वाचून बसेल धक्का

मुंबई : 'दृष्ट लागण्या जोगे सारे' हे गाणं आजही संगीत प्रेमींचं आवडतं गाणं... हे गाणं गुणगुणायला लागलं की, डोळ्या समोर येतात ती ट्रेनमधील ते नवं जोडपं. नव्या संसाराच्या स्वप्न उराशी बाळगून प्रवास करतात. 1986 प्रदर्शित झालेला सिनेमा आजही जस्साच्या तस्सा आठवणारे अनेक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. अजिंक्य देवसोबत असलेल्या या अभिनेत्री नव्या जोडप्यांच उत्तम प्रतिनिधीत्व केलं होतं. ही देखणी अभिनेत्री म्हणजे मुग्धा चिटणीस. कमी लोकांना या अभिनेत्रीचं नाव माहीत आहे. 

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकरांनी गायलेली या सिनेमातील गाणी आजही लोकांच्या फेव्हरेट प्ले लिस्टमध्ये आपलं स्थान घट्ट करून आहेत. सिनेमांत अजिंक्य देवच्या आईची भूमिका दिवगंत अभिनेत्री रीमा लागू यांनी साकारली होती. सासू आणि सुनेचं नातं साकारणाऱ्या या दोघींनी तेव्हाच्या परिस्थितीचा आढावा समोर मांडला होता. महत्त्वाची बाब म्हणजे मुग्धा चिटणीस या अभिनेत्री साकारलेला हा एकमेव सिनेमा. 

वाचून बसेल धक्का 

तुम्हाला वाचून धक्का बसेल पण या अभिनेत्रीचा वयाचा 31 व्या वर्षी मृत्यू झाला. 5 डिसेंबर 1994 साली कॅन्सरचे निदान झाले... आणि  10 एप्रिल 1996 साली या अभिनेत्रीचा कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, मुग्धा केवळ अभिनेत्री नव्हती तर ती उत्कृष्ट कथा-कथनकारही होती. भारत आणि अमेरिकेत त्यांनी कथाकथन शैलीत ५०० कार्यक्रम सादर केले होते. मुंबईतील ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये पुष्कळ कार्यक्रम सादर केले. १८ फेब्रुवारी १९६५ साली त्यांचा जन्म झाला. मुग्धा चिटणीस उमेश घोडके यांच्याशी लग्न झाले होते. कॅन्सरने मृत्यू झाला तेव्हा मुलगी ईशा अवघ्या ५ वर्षाची होती.

मुग्धाच्या मृत्यूनंतर मुलगी ईशा आपले आजी आजोबा अशोक आणि शुभा चिटणीस यांच्यासोबत मुंबईत राहिली. उमेश घोडके यांनी ईशाला आई आणि वडील असे दोघांचे प्रेम दिले. शिक्षणासाठी त्यांनी तिले अमेरिकेत नेले. ईशाने अमेरिकेत कायदे विभागात प्रमुख पदावर काम केलं. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून जर्मन भाषा आणि पत्रकारितेची पदवी मिळवली.