तोंडाला मास्क, खड्डे आणि..., प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने केला रिक्षाने प्रवास; तुम्ही ओळखलात का?

यात ती कुठे जात आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण तिने हा रिक्षा आणि रस्त्यावरील खड्डे हा प्रवास किती त्रासदायक असतो, याबद्दल सांगितले आहे. 

Updated: Jan 6, 2024, 07:15 PM IST
तोंडाला मास्क, खड्डे आणि..., प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने केला रिक्षाने प्रवास; तुम्ही ओळखलात का? title=

Mukta Barve Rickshaw Travel : मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार हे बहुतांश वेळी सार्वजनिक वाहनाने प्रवास करताना दिसतात. अनेकदा त्यांचे व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल होतात. नुकतंच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने रिक्षाने प्रवास केला आहे. त्याचा एक व्हिडीओ शेअर करत तिने या प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत.

मराठी मनोरंजनसृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेची ओळख आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. मुक्ता बर्वेच्या लुक्सबद्दल, कामाबद्दल तिला तिचे चाहते नेहमीच प्रतिक्रिया देत असतात. तिने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. नुकतंच तिने तिच्या रिक्षा प्रवासाचा अनुभव सांगितला आहे. 

मुक्ता बर्वेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तोंडाला मास्क लावून एका रिक्षात प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात ती कुठे जात आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण तिने हा रिक्षा आणि रस्त्यावरील खड्डे हा प्रवास किती त्रासदायक असतो, याबद्दल सांगितले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

"आताआपण शिकुया ‘बसल्याजागी करायचा नाच’ - यासाठी लागणारं साहित्य, रिक्षा, खड्डे आणि खड्यातून वाट काढत जाणारा रस्ता", असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. या पोस्टबरोबर तिने रस्ता, सुरक्षा, रिक्षा, मुंबई, ट्राफिक असे हॅशटॅगही वापरले आहेत. 

मुक्ता बर्वेच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी या पोस्टवर स्माईल इमोजी टाकत कमेंट केल्या आहेत. तर अभिनेत्री नम्रता संभेरावने 'वाह' असे म्हटले आहे. तर प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णीने 'अगदी खरंय' असे म्हटले आहे. सध्या तिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.