कोण आहे अंकिता कंवर? जिने केले मिलिंद सोमणसोबत लग्न

हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, बंगाली अशा विविध भाषांवर प्रभूत्व असलेली अंकिता मॅरेथॉनदरम्यानच मिलींद सोमणच्या प्रेमात पडली

Updated: Apr 22, 2018, 08:52 PM IST
कोण आहे अंकिता कंवर? जिने केले मिलिंद सोमणसोबत लग्न

ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई : अभिनेता, मॉडेल मिलींद सोमण पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढला आहे.  मिलींदने त्याच्याहून तब्बल २५ वर्षांनी लहान असलेल्या एअर होस्टेसशी लग्नगाठ बांधलीये. वर्षीय अभिनेता मिलींद सोमणने त्याच्याहून २५ वर्षांनी लहान (वय २७) गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबत विवाह केलाय. अलिबागमध्ये हा शाही विवाहसोहळा रंगला. दोन्ही कुटुंबीयांची काही मोजकीच मंडळी या लग्नसोहळ्याला हजर होती.

मिलींद सोमण अभिनेत्यापेक्षा मॉडेल म्हणूनच अधिक प्रसिद्ध

मिलींद सोमण हा अभिनेत्यापेक्षा एक मॉडेल म्हणूनच अधिक प्रसिद्ध आहे. मॅरेथॉन आणि मिलींद सोमण हेही एक समीकरण गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळतंय. याच मॅरेथॉन स्पर्धेत दीड वर्षांपूर्वी अंकिता आणि मिलींदची पहिली भेट झाली आणि त्यानंतर काही दिवसांतच या दोघांमध्ये लव्हस्टोरी फुलू लागली. एकमेकांचे सूर जुळले आणि काही दिवसांतच या दोघांनी लग्नाचा निर्णयही घेतला.

कोण आहे अंकिता कंवर?

दिल्लीत राहणा-या अंकिताने एअर एशिया एअरलाईन्समध्ये केबिन क्रू म्हणून कामाला सुरूवात केली होती. हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, बंगाली अशा विविध भाषांवर प्रभूत्व असलेली अंकिता मॅरेथॉनदरम्यानच मिलींद सोमणच्या प्रेमात पडली. २०१५ मध्ये अंकिताने मिलींदसोबत मॅरेथॉनचा टप्पाही पूर्ण केला होता. 

अफेअरमुळेही मिलिंद सोमण चर्चेत

खरंतर मिलींद सोमणचं हे दुसरं लग्न. याआधी जुलै २००६ मध्ये फ्रेंच अॅक्ट्रेस  मायलेनशी मिलिंदने लग्नाची गाठ बांधली होती. मात्र ती फार काळ काही टिकली नाही.  माजी मिस इंडिया आणि मॉडेल मधू सप्रेसोबतच्या अफेअरमुळेही मिलींद सोमण चर्चेत होता. आता अंकितासोबतची लग्नाची ही गाठ अशीच टिकून राहो याच तूर्त या जोडप्याला शुभेच्छा देऊयात...