मौनीचा 'हा' लूक कधीही न पाहिलेला, फोटो पाहून चाहत्यांना भूरळ

मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. 

Updated: Jul 26, 2022, 08:06 PM IST
मौनीचा 'हा' लूक कधीही न पाहिलेला, फोटो पाहून चाहत्यांना भूरळ	 title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मौनी रॉयने बॉलिवूडमध्येही स्वत: ची जागा मिळवली आहे. मौनी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मौनी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच मौनीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहे. मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. 

मौनीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनीने टू पीससोबत पांढऱ्या रंगाचं श्रग परिधान केलं आहे. हे फोटो शेअर करत मौनीनं लिहिलं की लाइफ एक व्हाइट डॅन्डिलायन आहे... मौनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या या फोटोंची सर्वत्र चर्चा आहे. तिच्या या फोटोला डब्बू रतनानीसोबत अनेक सेलिब्रिटींनी लाइक केलं आहे. मौनीच्या या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, तुझ्यापेक्षा सुंदर कोणी नाही...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मौनी रॉयनं छोट्या पडद्यापासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एकता कपूरच्या 'नागिन' या मालिकेतून मौनीला छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळाली आणि अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आत्तापर्यंत तिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत आणि छोट्या पडद्यावर असलेल्या रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेतही ती दिसली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मौनी रॉयने 27 जानेवारी 2022 रोजी बॉयफ्रेंड आणि दुबईस्थित बिझनेसमन सूरज नांबियारसोबत लग्न केले. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी बंगाली आणि मल्याळी परंपरेनुसार लग्न केले. मौनी आणि सुरज हे गोव्यात लग्न करत आहेत. लग्ना आधी होणारे सगळे कार्यक्रम देखील तिथेच झाले आहेत. मौनी आणि सुरजच्या हळदी आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यांच्या या प्रीवेडिंग कार्यक्रमांमध्ये मंदिरा बेदी, अर्जुन बिजलानीसोबत आणखी बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.