'लाल सिंग चड्ढा'ला भेटलात का?

नव्या अंदाजात तो आलाय तुमच्या भेटीला 

Updated: Nov 18, 2019, 12:50 PM IST
'लाल सिंग चड्ढा'ला भेटलात का?
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : हिंदी कलासृष्टीत 'परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खान Aamir Khan याने पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेच्या निमित्ताने काही आव्हानं पेलल्याचं पाहायला मिळत आहे. 'लाल सिंग चड्ढा' Laal Singh Chaddha या आमिरच्या आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतच प्रदर्शित करण्यात आलं. या पोस्टरमधून आणखी एका भूमिकेच्या निमित्ताने त्याचं नवं रुप पाहायला मिळत आहे. 

टॉम हँक्स स्टारर 'फॉरेस्ट हम्प'चा अधिकृत हिंदी रिमेक असणाऱ्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या घोषणेपासून त्याविषयी उत्सुकता पाहायला मिळत होती. ज्या उत्सुकतेच्या धर्तीवर आता चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पोस्टरमध्ये आमिर एका शीख गृहस्थाच्या रुपात दिसत आहे. दाढी- मिशा, पंजाबी पगडी, चौकटींचं तोडक्या बाह्यांचं शर्ट, चेहऱ्यावर एक हास्यमुद्रा आणि डोळ्यांत एक वेगळीच चमक असं एकंदर त्याचं रुप पोस्टवर पाहायला मिळत आहे. 

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीच्या रुपातील आमिरचा हा लूक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. 'सत स्री अकाल जी, माय सेल्फ लाल सिंग चड्ढा' असं कॅप्शन देत परफेक्शनिस्ट आमिरने त्याचा हा फोटो पोस्ट केला आहे. 

विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटातून अभिनेत्री करिना कपूरसुद्धा झळकणार आहे. ३ इडियट्स आणि तलाश या चित्रपटांनंतर करिना आणि आमिर पुन्हा एकत्र काम करत आहेत. त्यामुळे हीसुद्धा एक पर्वणी ठरणार आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये नाताळच्या दिवसांत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.