मुंबई : दिग्दर्शक सतीश राजवाडे मुंबई - पुण्याची गोष्ट घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. शुक्रवारी 'मुंबई-पुणे-मुंबई 3' हा सिनेमा प्रदर्शित झाला. अगदी पहिल्या सिनेमापासून प्रेक्षकांनी गौतम आणि गौरीची जोडी डोक्यावर उचलून धरली.
सिनेमात स्वप्नील - मुक्ताने साकारलेल्या गौतम - गौरीच्या संसारात आता छान फुलं उमलणार आहे. तीन वर्षांचा संसार आता पुढे सरकरला आहे. या संसाराची गोड कथा अनुभवण्यासाठी सिनेरसिक प्रेक्षकगृहात गर्दी करत आहे.
"मला सांगा..सुख म्हणजे नक्की काय असतं !"
.
.
आपल्या #MPM3 ला #Sup3rhit केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार...
दिमाखात सुरु आहे...जवळच्या चित्रपटगृहात !!!#mpm3 #weekendvibes #housefull #gratitude #teamwork pic.twitter.com/kvckBzMk4S— पुण्याचा गौतम (@swwapniljoshi) December 10, 2018
प्रेक्षकांच्या उदंडप्रतिसादानंतर या सिनेमाने अवघ्या 3 दिवसांत 5 करोड रुपयांहून अधिक कमाई केली आहे. स्वप्नील- मुक्ताव्यतिरिक्त प्रशांत दामले, सविता प्रभुणे, सुहास जोशी, मंगल केंकरे आणि विजय केंकरे यांची प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत.
'मुंबई-पुणे-मुंबई ' हा पहिला सिनेमा असा आहे ज्याचे 3 भाग आतापर्यंत आले आणि ते तिन्ही भाग प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले आहेत. मुक्ता बर्वे- स्वप्नील जोशी आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे ही जोडी तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहे.
मराठी सिनेमांनी आता लक्षवेधी कमाई केली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'नाळ' या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 17 कोटींची कमाई केली. तसेच प्रवीण तरडेचा 'मुळशी पॅटर्न' हा सिनेमा देखील गाजला. या सिनेमा बॉक्स ऑफिसवर 13 कोटींची कमाई केली. आता त्याच पावलावर पाऊल ठेवत 'मुंबई-पुणे-मुंबई 3' हा कोटींचा आकडा गाठत आहे.