वडिलांना अभिनय क्षेत्र मान्य नसताना Namrata Sambherao चा होता एकच हट्ट, म्हणाली...

Namrata Yogesh Sambherao : नम्रता संभेरराव ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. नम्रता संभेररावनं नुकतीच तिच्या वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं तिच्या वडिलांविषयी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 4, 2023, 10:58 AM IST
वडिलांना अभिनय क्षेत्र मान्य नसताना Namrata Sambherao चा होता एकच हट्ट, म्हणाली... title=
(Photo Credit : Namrata Sambherao Instagram)

Namrata Yogesh Sambherao : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम म्हटलं की सगळ्यांना आठवतात ते म्हणजे धम्माल कॉमेडी. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. या कार्यक्रमातील लॉली तर आपल्या सगळ्यांनाच ठावूक आहे. लॉली ही भूमिका साकारणारी अभिनेत्री नम्रता संभेरराव तर कॉमेडी क्वीन आहे. नम्रतानं इथवर पोहोचायला खूप मेहनत केली आहे. यावेळी फक्त तिचे आई-वडील नाही तर तिच्या सासरच्या लोकांनी देखील खूप मदत केली. तर वडिलांच्या वाढदिवसानिमित्तानं नम्रतानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. 

नम्रतानं ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नम्रतानं तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत नम्रता म्हणाली, “वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा, तुमची लाडकी मी... आमच्या तीन भावडांपैकी मी माझ्या वडिलांची लाडकी आहे हे मला माहित आहे. ‘अस्तित्व’ नावाची माझी पहिली एकांकिका. वांगणीला ती स्पर्धा झाली होती. तेव्हा मी 16 वर्षांची होते. जाताना नाटकाच्या ग्रुप बरोबर गेले. पण येताना लेक रात्री एकटी कशी येणार? या काळजीमुळे माझे वडील मला न्यायला आले आणि आलोच आहे तर काय करतेय लेक?, कसं करते? हे सुद्धा त्यांनी पाहिलं आणि तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही, त्यांनी एकांकिका पाहिली, कौतुक झालेल पाहिलं, मला अभिनयासाठी प्रथम पारितोषिक मिळालं तेव्हा तेही पाहिलं आणि सगळ्यात मोठं बक्षीस मिळालं मला त्यादिवशी ते पप्पांकडून, ते म्हणजे त्यांच्या डोळ्यातलं पाणी”.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : कोकणची माणसं साधीभोळी! कोकणात रमली Vanita Kharat, फोटो शेअर करत सांगितलं गावाचं नाव

पुढे म्हणाला, "माझ्याबद्दलचा अभिमान आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करण्याची परवानगी. अजून काय हवंय. मला आठवतंय जेवढं त्याप्रमाणे "बाहुलीच हवी मला द्या मज आणुनी" ह्या हट्टानंतर जर कुठला माझा हट्ट असेल तर तो म्हणजे "अभिनयच माझी कला घ्या तुम्ही जाणुनी" कारण पप्पाना मान्य नव्हतं हे क्षेत्र पण त्यामागे त्यांची माझ्याबद्दल वाटणारी काळजी होती. कोणीच नव्हतं या क्षेत्रात माहितीतलं पण फक्त विश्वासाच्या जोरावर त्यांनी मला पाठिंबा दिला नंतर जेव्हा आम्ही कधी बाहेर पडायचो अगदी कुठेही डॉक्टर कडे वगरे कि त्यांना सांगायचे माझा सगळा इतिहास , कुठली मालिका कुठलं पारितोषिक किंवा पुरस्कार, सगळं जे मला आठवत नसे तेही सगळं सांगायचे, पण त्यांच्या डोळ्यातला आनंद त्यांचा उत्साह बघून मन भरून यायचं माझे पप्पा जगात भारी आहेत माझं अतोनात प्रेम आहे त्यांच्यावर. खूप खूप प्रेम बाबा." नम्रतानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.