मुंबई : इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अनेक वर्षांनंतर उघड झाल्या. आज आपण जाणून घेणार आहोत जद्दनबाई यांच्याबद्दल. जद्दनबाई यांची मुलगी म्हणजे नरगिस दत्त (Nargis Dutt). नरगिस दत्त म्हणजे बॉलिवूडचं सर्वात मोठं नाव. ही गोष्ट आहे 1892 सालची. जेव्हा अलाहाबादच्या कुंटणखान्यात प्रसिद्ध 'तवायफ' दलीपाबाईंच्या घरी जद्दनबाईंचा जन्म झाला. आईच्या पावलावर पाऊल ठेवून जद्दनबाईंनीही ठुमरी आणि गझल म्हणायला सुरुवात केली.
गावात पोहोचलेल्या लोकांनी आमिष दिल्यानंतर दलीपाबाई अलाहाबादला पळून आल्या, पण त्या लोकांनी दलीपाबाईंना कुंटणखान्यात विकले. येथे त्यांचा विवाह सारंगी वादक मियाँ जान यांच्याशी झाला. त्यानंतर जद्दनबाई यांचा जन्म झाला. जेव्हा जद्दनबाई गायिकीमध्ये पाय ठेवला. तेव्हा त्यांनी आई दलीपाबाईंना देखील मागे टाकलं.
आई दलीपाबाईनंतर जद्दनबाई यांना प्रसिद्ध 'तवायफ'चा दर्जा मिळाला. त्यांच्या आवाजाची क्रेझ एवढी होती की त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आलेल्या दोन ब्राह्मण कुटुंबातील तरुणांनी जद्दनबाईं यांच्यासोबत लग्न करण्यासाठी कुटुंब सोडून इस्लाम धर्म स्वीकारला.
ब्राह्मण कुटुंबातील नरोत्तम यांनी इस्लाम धर्म स्वीकारत जद्दनबाई यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव अख्तर हुसैन होतं. पण हे लग्न अधिक काळ टिकलं नाही. नरोत्तम काही वर्षांनी जद्दनबाई यांना सोडून निघून गेले.
त्यानंतर काही वर्षांनंतर, कुंटणखान्यातील हार्मोनियम वाजवणारे उस्ताद इर्शाद मीर यांनी जद्दनबाई यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यांना अन्वर खान नावाचा दुसरा मुलगा झाला. त्यांचं दुसरं लग्नही टिकलं नाही.
दोन लग्न अपयशी ठरल्यानंतर जद्दनबाई यांच्या आयुष्यात मोहनबाबू यांची एन्ट्री झाली. मोहनबाबू देखील सर्व काही सोडून अब्दुल रशीद अशी नवीन ओळख तयार करुन जद्दनबाईंसोबत लग्न केलं. तिसऱ्या लग्नापासून नरगिस यांचा जन्म झाला.
जद्दनबाईही संगीताच्या विद्वानांकडून संगीत शिकण्यासाठी कुंटणखान्याबाहेर पडल्या. त्यांचा आवाज परदेशात पोहोचला. ब्रिटीश राज्यकर्ते त्यांना कार्यक्रमात गाण्यासाठी बोलावत असत.
रेडिओ केंद्रातील जद्दनबाईंचा आवाज देशभरातील लोकांना वेड लावत होता. लोकप्रियता वाढल्यावर त्यांना लाहोरच्या फोटोटोन कंपनीच्या राजा गोपीचंद या सिनेमात काम मिळाले.
काही सिनेमांमध्ये काम केल्यानंतर त्या कुटुंबासोबत मुंबईत आल्या. मुंबईत त्यांच्या आयुष्याला आणि करियअरला नवी कलाटनी मिळाली. अभिनयासोबतच जद्दनबाईंनी संगीतातही काम केलं. इतिहासात ही पहिलीच वेळ होती जेव्हा एखादी स्त्रीम्यूजिक कंपोज करत होती.
1935 मध्ये आलेल्या या सिनेमात त्यांनी 6 वर्षांची मुलगी नर्गिसला कास्ट केलं. प्रोडक्शन कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी तिने नर्गिसला सतत सिनेमात घेण्यास सुरुवात केली.
1940 पर्यंत जद्दनबाईंची प्रॉडक्शन कंपनी मोठ्या नुकसानीमुळे बंद झाली. जद्दनबाईंनी चित्रपटात काम करणे बंद केले. अखेर 8 एप्रिल 1949 रोजी जद्दनबाईंनी कॅन्सरशी झुंज देत जगाचा निरोप घेतला.