'अमावस' सिनेमाचे प्रमोशन सोडून गेली नरगिस फाखरी

नरगिस फाखरी व्ययक्तिक प्रश्नांना कंटाळून प्रमोशन सोडून गेली आहे.

Updated: Jan 30, 2019, 12:01 PM IST
'अमावस' सिनेमाचे प्रमोशन सोडून गेली नरगिस फाखरी title=

मुंबई: 'रॉकस्टार' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री नरगिस फाखरी लवकरच एका सिनेमात दिसणार आहे. 'अमावस' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी नरगिस सज्ज झाली आहे. तर नरगिसचा हा नवीन सिनेमा हॉरर असणार आहे. सूत्रांच्या सांगणयानुसार  नरगिस  सिनेमाचे प्रमोशन करणार नसल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. नरगिस जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात आली होती. परंतू काणालाही न सांगता ती भारत सोडून गेली आहे. तिच्या अशा वागण्यामुळे 'अमावस' सिनेमाची टिम मोठ्या संकटात सापडली. 5 जानेवारी रोजी 'अमावस' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा नरगिस उपस्थित होती. त्यानंतर 7 जानेवारी रोजी झालेल्या मुलाखतीत तिला पूर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड मॅंट अलोंजो आणि अभिनेता उदय चोप्रा सोबत असलेल्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले, त्यावर नरगिसने मात्र उत्तर देण्यास टाळले.

मुलाखतीत विचारण्यात येणाऱ्या व्ययक्तिक प्रश्नांना कंटाळून 9 जानेवारी रोजी होणारी मुलाखत तिने रद्द केली. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार नरगिस लवकरच सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात परतणार आहे. नरगिसने स्वत:च्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत काही कामासाठी दुबईला आल्याचे तिने सांगितले आहे. 

 

सिनेमात मुख्य भूमिकेत सचिन जोशी झळकणार असून सिनेमाचे दिग्दर्शन भूषण पटेल यांनी केले आहे. 'अमावस' सिनेमा 8 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.