भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर नताशाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून ती प्रेमाचा खरा अर्थ समजावण्याचा प्रयत्न करत आहे. तिने स्टोरी शेअर करताना त्यामध्ये कोणतीही नोट लिहिलेली नाही. फक्त आपल्या स्टोरीत रिपोस्ट केली आहे. हार्दिक पांड्याला घटस्फोट दिल्यानंतर अनेक आठवड्यांनी तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
नताशाच्या पोस्टमध्ये प्रेम निस्वार्थी आणि सत्य असण्याबद्दल सांगण्यात आलं आहे. त्यात असंही नमूद केलं आहे की, खरं प्रेम कधीही अपयशी ठरत नाही. ते वाईट आणि चुकीच्या कल्पनेपासून खूप दूर आहे. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरील नोटमध्ये असं लिहिलं आहे की, "प्रेम सहनशील आहे. प्रेम दयाळू आहे. ते मत्सर करत नाही. ते मोठेपणा करत नाही. गर्व करत नाही. तो इतरांचा अनादर करत नाही. तो स्वार्थ साधणारा नाही. तो सहजासहजी रागावत नाही. चुकीच्या गोष्टींची नोंद ठेवत नाही. परंतु सत्याने आनंदित होते, नेहमी विश्वास ठेवते, नेहमी टिकवून ठेवते.
घटस्फोट झाल्यापासून नताशा सोशल मीडियावर असे अनेक तत्वज्ञान देणाऱ्या पोस्ट शेअर करत आहे. घटस्फोटानंतर तनाशाने आपल्या 4 वर्षांचा मुलगा अगस्त्य सोबत देश सोडला आहे.
हार्दिक आणि नताशा 31 मे 2020 रोजी विवाहबंधनात अडकले आणि त्याच वर्षी जुलैमध्ये मुलाचं आगमन झालं. जुलैमध्ये, त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक संयुक्त निवेदन जारी केले, ज्यामधून गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या नात्यात अडचणी असल्याच्या दाव्यांवर शिक्कामोर्तब झालं. नताशा आणि हार्दिक यांनी लिहिलं की, त्यांनी लग्न वाचवण्यासाठी एकत्रितपणे सर्वतोपरी प्रयत्न केला आणि आमचे सर्व काही दिले. तथापि, गोष्टी अपेक्षेप्रमाणे झाल्या नाहीत आणि त्यांना निर्णय घ्यावा लागला.
घटस्फोटासंबंधी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात त्यांनी लिहिलं आहे की, "4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर, हार्दिक आणि मी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्र प्रयत्न केले आणि आमचे सर्व काही दिले आणि आम्हाला विश्वास आहे की हे आमच्या दोघांच्या हिताचे आहे. आनंद, आदर आणि साहचर्य लक्षात घेता आणि एक कुटुंब वाढवत असताना हा निर्णय घेणे आमच्यासाठी कठीण होतं".
मुलगा अगस्त्यचा आपण दोघेही मिळून सांभाळ करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच त्याच्या आनंदाची सर्वतोपरी खात्री केली जाईल. त्यांच्या विभक्त होण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.