Navratri 2023 Marathi Serial : नुकताच नवरात्रीचा उत्सव सुरु झालाय. देशभरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. झी मराठीवरील मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींनी या नवरात्रोत्सवाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अप्पी (शिवानी नाईक) म्हणाली की, नवरात्री हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा सण आहे. कारण या नऊ दिवसात प्रसन्न आणि छान वातावरण असतं. देवी मधली शांतता, आत्माविश्वास, तिच्या डोळ्यातील तेज मन प्रसन्न करत.
देवीची नऊ रूपं आपल्यावर कुठल्या न कुठल्या प्रकारे प्रभाव पाडतात. या वर्षी मी शूट करत असेन पण मी नक्की देवीचे दर्शन व आशिर्वाद नक्कीच घेईन आणि तिचे मनापासून आभार मानेन. सगळ्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा."
'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेतून उमा (खुशबू तावडे) हिने देवीच्या स्वागतासाठी काय तयारी केली आहे हे, उत्साहाने सांगताना म्हणाली, 'नवरात्री साजरी करण्यासाठी मी खूप आतुर आहे. मला असे वाटते देवी मधली जी शांतता, संयम व निर्मळपणा तो मी जोपासला आहे. आयुष्यात संयम व शांत स्वभाव असावा कारण त्यामूळे खूप मदत होते.'
हेही वाचा : DDLJ मध्ये राजनं जादूनं शोधली सिमरनची ब्रा? चाहत्यानं स्लो मोशनमध्ये ओळखली चूक
देवीवर विश्वास ठेवून मेहेनत करत राहावं असे माझे मत आहे. मी आमच्या मालिकेच्या सेटवरच कलाकारांसोबत हा उत्सव थाटात साजरा करणार आहे. या वर्षी माझा मुलगा 2 वर्षांचा झाला आहे. त्याला वेगवेगळ्या सणांबद्दल माहिती झाली आहे, म्हणून मी त्याला गरबा दांडिया खेळायला घेऊन जाईन. या सुंदर उत्सवासाठी सगळ्या भाविकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.' पाहायला विसरू नका 'अप्पी आमची कलेक्टर' आणि 'सारं काही तिच्यासाठी' संध्या 6.30 आणि 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.