प्रभूदेवाच्या एक्सगर्लफ्रेंन्डचा साखरपुडा? फोटो होतायेत व्हायरल

नयनताराने प्रियकर विघ्नेश शिवनसोबत साखरपुडा केला

Updated: Mar 26, 2021, 08:28 PM IST
प्रभूदेवाच्या एक्सगर्लफ्रेंन्डचा साखरपुडा?  फोटो होतायेत व्हायरल

मुंबई : साऊथची लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा तिच्या लूक आणि सिनेमांमुळे बर्‍याचदा चर्चेत असते. मात्र आज नयनतारा सोशल मीडियावर एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. नयनताराने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, यावरून असा अंदाज वर्तविला जात आहे की, नयनताराने प्रियकर विग्नेश शिवनसोबत साखरपुडा केला असावा. नयनताराने सोशल मीडियावर दोघांचे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यांचा सोशल मीडियावर बोलबाला आहे.

या फोटोत या दोघांनीही आपला चेहरा दाखविला नसला तरी. विघ्नेश आणि नयनतारा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो पाहिला असता. फोटोमध्ये नयनताराच्या हातात एंगेजमेंट रिंग दिसत आहे.

मजेशीर बाब म्हणजे नयनताराचा प्रियकर विघ्नेश शिवाननेही फोटो शेअर करत तामिळ भाषेत एक कॅप्शन लिहिलं आहे. जे कॅप्शन आर्कषणाचा विषय ठरत आहे. ''मी माझं आयुष्य बोटांनी धरण्याचा प्रयत्न केला''. या आशयाचं कॅप्शन विघ्नेशनं या फोटोला दिली आहे.

कॅप्शनवरून चाहते अंदाज लावत आहेत की, या दोघांनी गुपचुप साखरपुडा पार पाडला आहे. नयनतारा आणि विघ्नेश जवळपास ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि या दोघांनी बर्‍याचदा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांकडे आपल्या प्रेमाचा खुलासा केला आहे.

नयनतारा आणि विघ्नेश 2015 पासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. 'नानम राउडी धान'च्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली आणि तेव्हापासून त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली आणि आता शेअर केलेल्या फोटोंवरुन हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्यांचं दिसत आहे.

याआधी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक प्रभूदेवासोबत नयनताराचे प्रेमसंबंध असल्यांच्या बातम्या समोर येत होत्या. असंही म्हटल जातं की, प्रभास आणि नयनतारा लिव्ह-इनमध्येही राहत होते. प्रभुदेवाने तिच्याशी लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीला घटस्फोट देखील दिला.

नयनताराला 2003 साली दिग्दर्शक सत्यन अंतकड याने तिच्या मल्याळम सिनेमात 'ब्रेक' दिला होता आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ती दररोज नव-नवीन करण्याचा प्रयत्न करत असते.

यानंतर, २००५ मध्ये, नयनताराने 'अय्या' या सिनेमाने तमिळ सिनेमातही एन्ट्री घेतली. तेलगू आणि तामिळ सिनेमांमध्ये नाव कमावल्यानंतर नयनताराने २०१० मध्ये 'सुपर' सिनेमातून कन्नड चित्रपटसृष्टीतही पदार्पण केलं.