कुठे गेलं हिंदुत्त्वं? सलमानच्या ईद पार्टीला कंगनाला पाहून चाहत्यांचा संताप

पार्टीत एन्ट्री घेण्यापूर्वी तिने ईद मुबारक अशा शुभेच्छाही दिल्या.

Updated: May 4, 2022, 01:25 PM IST
कुठे गेलं हिंदुत्त्वं? सलमानच्या ईद पार्टीला कंगनाला पाहून चाहत्यांचा संताप  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : ईदनिमित्त अभिनेता सलमान खानने (Salman Khan) पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. जॅकलीन फर्नान्डिस, करिष्मा कपूर आणि 'बिग बॉस' फेम शहनाज गिल सुद्धा उपस्थित होत्या. कंगना राणौत (Kangana Ranaut) सुद्धा या पार्टीत दिसली. कंगनाने पार्टीला उपस्थिती लावल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. (Kangana Ranaut shows up at salman khans eid party)

'वूम्पला' नावाच्या इन्स्टाग्राम पेजने कंगनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाने ऑफ व्हाईट आणि गोल्डन रंगाचा शरारा सूट घातल्याचं पाहायला मिळत आहे. पार्टीत एन्ट्री घेण्यापूर्वी तिने ईद मुबारक अशा शुभेच्छाही दिल्या.

कंगनाच्या देसी लूकमुळे चाहते घायाळ झाले. तर काहींनी सोशल मीडियावर तिला ट्रोलही केले आहे. कंगनाचा हा व्हिडीओ नेटिझन्ससाठी चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

कंगना सलमानच्या ईद पार्टीला उपस्थित राहिल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. काहींनी तिच्या हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत, कुठे गेलं हिंदुत्त्वं? असे बोचरे प्रश्नही केले आहेत. 

आता मुद्दा असा, की कंगना नेटकऱ्यांच्या या प्रश्नांची आणि प्रतिक्रियांची कोणत्या शब्दांत उत्तरं देते...