निकशी लग्न होईल असा कधी विचार केला नव्हता; प्रियंका चोप्राचा खुलासा

प्रियंका 'वुमन इन द वर्ल्ड समिट'मध्ये दाखल झाली होती.

Updated: Apr 13, 2019, 10:22 AM IST
निकशी लग्न होईल असा कधी विचार केला नव्हता; प्रियंका चोप्राचा खुलासा

नवी दिल्ली : बॉलिवूड देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास त्यांच्या लग्नानंतर नेहमीच एकत्र एन्जॉय करताना दिसतात. नुकतचं प्रियंका 'वुमन इन द वर्ल्ड समिट'मध्ये दाखल झाली होती. या समिटमध्ये प्रियंकाने तिच्या रिलेशनशिप, वैवाहिक जीवन आणि महिलांविषयी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. या पॅनल चर्चेदरम्यान प्रियंकाने 'मी निकशी लग्न करेल असं कधीच वाटलं नसल्याचं' म्हटलंय.

समिटमध्ये प्रियंकाने तिच्या आणि निकच्या नात्याबाबत अनेक खुलासे केले. प्रियंकाने ती आणि निक जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते त्यावेळी निकने अनेकदा मला आश्चर्यचकित केल्याचं सांगितलं. मी निकला गेल्या २ वर्षांपासून ओळखते. मला कधीच वाटलं नव्हतं असं कधी होईल. मी निकला ओल्ड मॅन जोनास अशी हाक मारते. माझ्यासाठी त्याचं नाव OMG आहे. निक अतिशय समजूतदार, हुशार आणि माझ्यासाठी खूप चांगला आहे. मी अतिशय बिनधास्त मुलगी आहे. मला नेहमी जे वाटतं ते मी करते आणि यासाठी निक नेहमीच मला सपोर्ट करत असल्याचंही यावेळी प्रियंकाने सांगितलं. 

प्रियंकाने त्यांच्या रिलेशिपच्या सुरूवातीच्या दिवसांतील एका घटनेबाबतही उल्लेख केला आहे. मी एक दिवस माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत नाईट आउटचा प्लान करत होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं होतं. त्यावेळी निकने मला 'मी त्या लोकांपैकी नाही की, तुला काम रद्द करण्यास सांगेन. मला माहित आहे आता तु जिथे आहे तिथे पोहचण्यासाठी तु किती मेहनत करत आहे. तु तुझ्या कामाला कमी महत्त्व देऊ नये असं मला वाटतं. तु तुझं काम पूर्ण करून ये, आम्ही तुझी वाट पाहू.' असं निकने म्हटल्यांच प्रियंकाने सांगितलं. मी आज जे काही कमावलं आहे त्याचं श्रेय निकने मला दिलं आणि ही गोष्ट माझ्यासाठी अतिशय आश्चर्यकारक असल्याचं प्रियंकाने म्हटलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियंका लवकरच 'स्काय इज पिंक'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जायरा वसीम आणि फरहान अख्तर प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तर निक जोनासचे 'कूल' आणि 'सकर' हे दोन म्यूझिक व्हिडिओ प्रदर्शित झाले आहेत. २०१८ साली डिसेंबर महिन्यात प्रियंका आणि निकचा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर निक आणि प्रियंका दोघेही अनेक ठिकाणचे त्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असतात.