Salman Khan Production : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान फक्त एक अभिनेता नाही तर प्रोड्युसर देखील आहे. त्यानं प्रोड्युस केलेल्या एखाद्या चित्रपटात काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. अशात समजा जर त्याच्या प्रोडक्शन हाऊसमधून इच्छूक व्यक्तीला कॉल आला तर, नक्कीच ते आनंदी होतील. मात्र, सध्या सलमानच्या नावावर स्कॅम सुरु आहे. सलमानच्या प्रोडक्शन हाऊसनं फेक कास्टिंग कॉलवरून एक स्टेटमेंट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं की चित्रपटांच्या कास्टिंगसाठी ते कोणत्याही थर्ड पार्टीवर अवलंबून राहत नाहीत. त्यांच्या नावाचा वापर करून जे कोणी हा स्कॅम करत आहेत त्यांच्या विरोधात कंपनी कायदेशीर कारवाई करणार आहे.
सलमान खान प्रोडक्शन हाउस ऑफिशियल ट्विटर हॅन्डलवरून एक ट्वीट करत हे स्पष्ट केलं आहे. त्याशिवाय त्यांनी हे देखील सांगितलं की सध्या ते कोणत्याही चित्रपटाची कास्टिंग करत नाही आहेत. प्रोडक्शन हाउससंबंधीत अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत. अनेकांनी SKF बॅनर अंतर्गत बनवण्यात येणाऱ्या चित्रपटांसाठी कास्ट करण्याविषयी चर्चा केली. या कास्टिंगमध्ये सलमान खानचं नाव वापरण्यात आलं आहे. अभिनेत्याचं नाव खराब होणार नाही, यासाठी टीमनं ट्विटरवर लगेच अलर्ट जारी केला.
Official Notice! pic.twitter.com/AwojQN73O4
— Salman Khan Films (@SKFilmsOfficial) January 30, 2024
प्रोडक्श टीमनं लिहिलं की आम्हाला हे स्पष्ट करायतं आहे की नाही सलमान खान नाही सलमान खान फिल्म्स कोणतं कास्टिंग करत आहेत. आम्ही कोणत्याही आगामी चित्रपटाच्या कास्टिंगसाठी कोणत्याही कास्टिंग एजंटला हायर केलेलं नाही. त्यासंबंधीत असलेला कोणताही ईमेल किंवा मेसेज जो तुम्हाला मिळाला आहे, त्यावर विश्वास ठेऊ नका. जे पण SKF या सलमान खान फिल्मचं नाव चुकीच्या पद्धतीनं वापरत आहात. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हेही वाचा : तस्कराला डेट करायची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री! धमकी देत म्हणाला- ‘तुझ्या मुलीचे पाय सूटकेसमध्ये…’
दरम्यान, सलमान खानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर सगळ्यात शेवटी तो कतरिना कैफसोबत 'टायगर 3' मध्ये दिसणार आहे. तर लवकरच तो करण जोहरसोबत एक चित्रपट करणार आहे. तर हा एक अॅक्शन चित्रपट असेल असे म्हटले जाते. या चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णुवर्धन करणार आहे असे म्हटले जात आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत असेल अशी ही माहिती समोर आली आहे. यात सलमान एक पॅरामिलिट्री ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. खरंतर 2023 मध्ये चित्रपटावर काम सुरु होणार होतं. मात्र, आता या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये सुरु होणार आहे.