close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून आलियाच्या नावाचा मंत्र म्हणतोय नवाज

मांत्रिकाच्या भूमिकेत नवाज 

Updated: Oct 17, 2019, 05:09 PM IST
...म्हणून आलियाच्या नावाचा मंत्र म्हणतोय नवाज

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'हाऊसफुल ४' चित्रपट काही दिवसांतच प्रदर्शित होणार आहे. नुकताच चित्रपटाचा 'द भूत सॉन्ग' प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटातील समस्त कलाकारांसहीत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी देखील या गाण्यात झळकणार आहे. नवाजचा अनोखा अंदाज या गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 

‘हाऊसफुल’ या फ्रँचाइजीमधला ‘हाऊसफुल ४’ हा चौथा चित्रपट आहे. अक्षय शिवाय चित्रपटात रितेश देशमुख, क्रिती सनॉन, बॉबी देओल, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा अशी कलाकारांची एकत्र मेजवाणी चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 

या गाण्यामध्ये नवाज एका मांत्रिकाच्या भूमिकेत दिसत आहे. अक्षयच्या अंगातील भूत बाहेर कढण्यासाठी नवाज प्रयत्न करताना दिसत आहे. त्यावेळी तो अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाचा प्रयोग करताना दिसत आहे.