'न्यूटन' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

भारतात दरवर्षी शेकडो सिनेमे बनतात मात्र प्रतिष्ठित ऑस्कर अॅवॉर्डपासून भारत अद्यापही खूप दूर आहे. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 16, 2017, 02:11 PM IST
'न्यूटन' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर title=

नवी दिल्ली : भारतात दरवर्षी शेकडो सिनेमे बनतात मात्र प्रतिष्ठित ऑस्कर अॅवॉर्डपासून भारत अद्यापही खूप दूर आहे. 

या वर्षी भारताकडून ऑस्करसाठी न्यूटन सिनेमा गेला होता. मात्र ऑस्करच्या शर्यतीतून न्यूटन बाहेर झालाय. ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या न्यूटनला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जातेय.

अनेकांच्या मते न्यूटन ऑस्करमध्ये जाण्यालायक नव्हता. तर अनेकांना असे वाटते की न्यूटनच्याऐवजी दंगलला ऑस्करमध्ये पाठवायला हवे होते. 

राजकुमार राव स्टारर न्यूटनने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. समीक्षकांनीही या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला होता.