नवाजुद्दीनही 'मीटू'च्या फेऱ्यात, माजी मिस इंडियाने केले हे आरोप

 आता या आरोपांना तो कसा सामोरं जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Updated: Nov 10, 2018, 02:15 PM IST
नवाजुद्दीनही 'मीटू'च्या फेऱ्यात, माजी मिस इंडियाने केले हे आरोप  title=

मुंबई : तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर   मीटू मोहिम अधिक चर्चेत आली.गायक अनु मलिक, क्रिकेटपटू लसिथ मलिंगा, फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो, कॉमेडिअन अदिति मित्तल अशी अनेक नाव याप्रकरणानंतर चर्चेत आली. आता मीटू मोहिमेअंतर्गत आणखी एक अभिनेत्री पुढे आलीय.  आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाबाबत वाचा फोडली आहे. सध्या करियरच्या सर्वात उच्च स्थानी असलेल्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीवर तिने लैंगिक शोषणाचे आरोप केलेयत.

बदलापूर, गॅंग्स ऑफ वासेपूर पासून ते आताच्या सेक्रेड गेम्स सिरिजपर्यंत सर्वच ठिकाणी नवाजुद्दीनने आपल्या अभिनयाचा दर्जा दाखवून दिलायं. केवळ मेहनतीच्या जोरावर तो इथपर्यंत पोहोचलाय. आता या आरोपांना तो कसा सामोरं जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कथित प्रेयसी 

निहारिका सिंहने नवाजुद्दीनवर हे आरोप केले आहेत. निहारिका ही नवाजुद्दीनची कथित प्रेयसी असल्याचे म्हटले जाते तसेच ती माजी मिस इंडिया म्हणून देखील ओळखली जाते.

काय आहेत आरोप ?

जबरदस्तीने नवाजुद्दीन यांनी आपल्याला बाहुपाशात घेतलं असल्याचा आरोप निहारिका सिंहने केलाय.

या आरोपांनंतर अद्याप नवाजद्दीनची कोणती प्रतिक्रिया आली नाहीय.

तो यावर काय म्हणतो याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलंय.