मुंबई : सध्या एका हिंदी मालिकेवर चारही बाजूंनी टीका होत आहे. या टीव्ही सिरियलमध्ये ९ वर्षाचा मुलगा आहे, ज्याचं १८ वर्षाच्या मुलीवर प्रेम आहे.
एवढंच नाही या दुपट्ट वय असलेल्यांमध्ये एवढी मैत्री होते की, तो तिला लग्नासाठी विचारणाही करतो.
सोनी टेलव्हिजनच्या पहरेदार पिया की या कन्सेप्टवर सध्या जोरदार टीका होत आहे. या मालिकेत अॅक्ट्रेस आहे तेजस्वी प्रकाश वयंगंकर, जिला १८ वर्षाची राजकुमारी दिया सिंहची भूमिका देण्यात आली आहे, जिचा पती वयाने ९ वर्षाचा आहे.
बाल कलाकार अफान शान शोमध्ये राजकुमार रतन सिंहची भूमिका पार पाडत आहे.
या टीव्ही मालिकेत ९ वर्षाच्या मुलाचं १८ वर्षाच्या मुलीला प्रपोज केल्याने, या मालिकेवर सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा होत आहे.