बिकीनी, शॉर्ट्स, टाईट कपडे काहीच नाही... अर्जूनच्या Malaika नं कॅरी केला सोज्वळ लुक

एरवी सतत टाईट कपडे, जीम लुक आणि बिकीनीत दिसणाऱ्या मलायकानं यावेळी मात्र सोज्वळ लुकनं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तुम्ही तिचा हा नवा लुक पाहून नक्कीच शॉक झाल्याशिवाय राहणार नाही. 

Updated: Oct 21, 2022, 10:27 PM IST
बिकीनी, शॉर्ट्स, टाईट कपडे काहीच नाही... अर्जूनच्या Malaika नं कॅरी केला सोज्वळ लुक title=

Malaika Arora Tranditional Look: मलायका अरोराचा (Malaika Arora) फॅशन सेन्स पाहून तिला कायम किम कार्देशियनची उपमा दिली जाते. तिचा प्रत्येक लुक हा सोशल मीडियावर (Malaika Arora on Instagram) हल्लाबोल करत असतो. कधी जीम लुक तर कधी टाईट कपडे (Tight Clothes) घातल्यामुळे ती ट्रोल होते मग आता मलायकाचा नवा लुक पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. (No Hot and Sexy malaika arora keeps simple yet classy look viral photos latest cebeb news)

तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा अतिशय मनमोहक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा लूक क्षणार्धात बदलतो. या रीलमधून मलायकानं चक्क टाईट कपडे न घालता साडीचा ग्लॅमरस लुक (Malaika Arora Glam Look) केला आहे. मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या या बेस्ट लूकवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओवर आतापर्यंत 57 हजारांहून अधिक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओ शेअर करताना मलायका अरोराने कॅप्शनमध्ये (Malaika Arora Reels) लिहिले आहे की, 'ओके, लेट्स डू इट...' व्हिडिओच्या सुरुवातीला मलायका जिमच्या आउटफिटमध्ये दिसत आहे आणि नंतर तिनं आपला हा लुक शेअर करताच तो सगळीकडे व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे.

आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे

व्हिडिओ शेअर करताना सेमलाइकाने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही जबरदस्त फोटो शेअर केले होते, ज्यात ती खूप सुंदर दिसत होती. फोटोमध्ये तिने मोती आणि कुंदनने बनवलेले हिरवे दागिने फ्लॉंट केले होते.

मलायका तिची बहीण अभिनेत्री अमृतासोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवणार आहे. ती 'अरोरा सिस्टर्स'मधून (Arora Sisters) वेब डेब्यू करणार आहे. हा वेब शो पूर्णपणे तिच्या आणि बहीण अमृता अरोरा यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर केंद्रित असेल आणि या शोमध्ये मलायकाचा पुर्वीश्रमीचा पती अरबाज खान आणि तिचा प्रियकर अर्जुन कपूर (Arjun Kapoor) देखील या शोमध्ये हजेरी लावणार आहेत.