Nora Fatehi ने नवरी बनुन घेतला चीज सॅन्डविचचा आनंद , कॅमरा सुरु आहे हे कळताच दिले असे रिएक्शन

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही आपल्या चाहत्यांची मने आपल्या डान्सने, आपल्या अदांनी आणि आपल्या अभिनयाने जिंकले आहे. 

Updated: Apr 21, 2021, 09:07 PM IST
Nora Fatehi ने नवरी बनुन घेतला चीज सॅन्डविचचा आनंद , कॅमरा सुरु आहे हे कळताच दिले असे रिएक्शन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही आपल्या चाहत्यांची मने आपल्या डान्सने, आपल्या अदांनी आणि आपल्या अभिनयाने जिंकले आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की? नोरा फतेही ही एक फूडी गर्लही आहे. नोराला पाहूण तुम्हाला हे खरे वाटणार नाही. परंतु हे स्वतः नोराने एका व्हिडिओ मार्फत चाहत्यांना दाखवले आहे.

नवरी बनून चीज सँन्डविचचा आनंद

नोरा फतेहीचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये नोरा डान्स करत नाही, तर ती चक्कं चीज सँन्डविच खाण्याचा आनंद घेत आहे. पण नोराला जेव्हा समजते की, तिच्या समोर कॅमेरा सुरु आहे आणि तिचा व्हिडीओ बनत आहे, तेव्हा ती हसते आणि तिच्या पदराने तिचा चेहरा लपवते.

नोरा फतेहीचे एक स्वप्न आहे, जे ती इतकी प्रसिद्ध असूनही अद्याप पूर्ण झालेले नाही. आता तुम्ही म्हाणाल तरुणांच्या मनातील स्वप्न बनलेल्या नोराच्या मनातील इच्छा अजूण पूर्ण झालेली नाही?...हे कसं शक्य आहे? परंतु....हो हे खरे आहे. नुकत्याच एका डान्स रिएलिटी शोमध्ये पाहुणे म्हणून आलेल्या नोराने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिची ही इच्छा लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

या चित्रपटात नोरा दिसणार

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर नोरा फतेही लवकरच अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हाच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात दिसणार आहे.